25153
भारतीय संविधान सर्वसमावेशक
संजय पेंडूरकर ः कट्टा येथे ‘जीवनदर्शन’ स्पर्धेचे बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १७ ः संविधान निर्मिती हे बाबासाहेबांचे अलौकीक कार्य असून त्याप्रमाणे वागणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यांचे कार्य दलित समाजापुरते मर्यादित नसून समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी काम केले. त्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संजय पेंडूरकर यांनी केले.
बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन स्पर्धा परीक्षेचा बक्षीस समारंभ झाला. यावेळी प्रमुख वक्ते श्री. पेंडूरकर बोलत होते. यावेळी अर्जून पेंडूरकर, कसाल हायस्कूल मुख्याध्यापक उत्तम मळगावकर, ओसरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय मर्डे, शिक्षक प्रकाश महाभोज, किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, शोभा म्हाडगुत, रमेश म्हाडगुत, दीपक भोगटे, अर्चना धुत्रे, मंगल पराडकर, साक्षी अमरे, मनोज काळसेकर, विद्या चिंदरकर, बाळकृष्ण गोंधळी, मारुती चव्हाण उपस्थित होते.
कसाल हायस्कूलचे मुख्याध्यापक मळगावकर यांनी, विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाल्याने त्यांची दोनदा परीक्षा घ्यावी लागली. या परीक्षेसाठी दिलेले पुस्तक शिक्षकांनासाठीही उपयुक्त आहे, असे सांगून सेवांगणच्या शैक्षणिक उपक्रमास नेहमीच सहकार्य राहील, असे सांगितले. ओसरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक मर्डे यांनीही मार्गदर्शन केले. शुद्ध पाणी आणि पर्यावरण या पुढील काळात भेडसावणाऱ्या समस्या असून आतापासून सर्वांनी जागरूक राहणे आवश्यक आहे, असे आवाहन केले. संगीत विद्यालयाचे संचालक अर्जून पेंडूरकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती दिली. पोखरण हायस्कूलचे विद्यार्थी हर्षदा गावकर व विक्रांत सावंत यांनी परीक्षेचे विश्लेषण केले. ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खूपच मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, शैक्षणिक साहित्य व सहभागी सर्व शाळांना फ्रेम केलेले अभिनंदन पत्र देण्यात आले.
....................
मालवणात उद्या बक्षीस वितरण
सेवांगणचे विश्वस्त दीपक मोगटे यांनी या स्पर्धा परीक्षेची माहिती दिली. मालवण तालुक्यातील २५ हायस्कूल, १० प्राथमिक शाळा, गोव्यातील ४ हायस्कूल व परिसरातील ३ हायस्कूलमधील ४ हजार विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले. त्यातील २०० गुणवंत विद्यार्थ्यांना वडाचापाट, कट्टा येथे बक्षीस वितरण झाले असून मालवण येथे गुरुवारी (ता. १९) दुपारी ३ वाजता बक्षीस समारंभ असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.