मालवणात २६ ला
मराठी लेखन स्पर्धा
मालवण : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून येथील रोटरी क्लबच्यावतीने २६ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता कन्याशाळा येथे तालुकास्तरीय मराठी शुद्ध लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी खुली आहे. स्पर्धकांना लेखणी, कागद आणि शुद्ध लेखनासाठीचा मजकूर आयोजकांकडूनच पुरविला जाणार आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी आहे. इच्छुकांनी लिमये हॉस्पिटल, मालवण येथे संपर्क साधावा. तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लबने केले आहे.
----------
मडुरा येथे आज
रेकॉर्ड डान्स स्पर्धा
बांदा ः मडुरा येथील छत्रपती शिवप्रेमी व्हाट्सॲप ग्रुपतर्फे उद्या (ता. १९) शिवजयंती सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी ९ वाजता छत्रपतींच्या मूर्तीची भव्य मिरवणूक, त्यानंतर प्राणप्रतिष्ठा, शिवपूजन व दीपपूजन, सायंकाळी ६ वाजता महिलांची फुगडी, ७ वाजता भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा होईल. यासाठी प्रथम ५ हजार ५५५ रुपये व चषक, द्वितीय ३ हजार ३३३ रुपये व चषक ठेवण्यात आले आहेत. ही स्पर्धा श्री माऊली मंदिर रंगमंचावर होईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रवीण उर्फ पिंटो परब या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------
मालवणात १ मार्चला
योजनांचे महाशिबिर
सिंधुदुर्गनगरी ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यावतीने मालवण येथे १ मार्चला विधी सेवा, शासकीय सेवा व योजनांचे महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
...................
असलदेत आज
विविध कार्यक्रम
नांदगाव ः असलदे गावठण येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उद्या (ता. १९) शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ग्रामविकास मंडळ व शिवसाई मित्रमंडळ यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन, सायंकाळी सातला दीपप्रज्वलन व मान्यवरांचे स्वागत, साडेसातला लहान मुलांची भाषणे, रात्री ९ वाजता स्थानिक भजन, १० वाजता दिंडी भजन होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामविकास मंडळ व शिवसाई मित्रमंडळ असलदे गावठण यांच्यावतीने केले आहे.
.......................
सावंतवाडीत आज
‘श्री क्षेत्र गाणगापूर’
सावंतवाडी ः शहरातील तिलारी कॉलनी रोड, न्यू खासकीलवाडा येथील शिवप्रसाद कला व क्रीडामंडळातर्फे शिवजयंती उत्सव उद्या (ता. १९) विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी शिवपूजन व विविध कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता श्री सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ, आवेरे (ता. वेंगुर्ले) यांचा ‘श्री क्षेत्र गाणगापूर’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. नाट्यप्रयोग व शिवजयंती कार्यक्रम तिलारी कॉलनी रोड शिवपुतळ्याजवळ होणार आहे. शिवजयंती उत्सव व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवप्रसाद कला व क्रीडा मंडळाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.