फिनोलेक्स अकॅडमीमध्ये
एमसीए सीईटीवर कार्यशाळा
रत्नागिरी, ता. १८ : फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी येथील एमसीए विभागाच्या वतीने महाराष्ट्र एमसीए सीईटी : संकल्पना, सराव आणि रणनीती या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र एमसीए सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अॅप्टिट्यूड प्रशिक्षण घेण्यात आले.
या कार्यशाळेत अपटेक येथील ॲप्टिट्यूड आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक प्रा. शिवानी भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी परिमाणात्मक क्षमता, तार्किक विचार, भाषिक क्षमता, प्रश्न सोडवण्याच्या रणनीती या घटकांवर सविस्तर प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांसाठी विविध सराव प्रश्न घेण्यात आले. यासोबतच इंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रह वाढवणे, वाचन समज आणि संवाद कौशल्य यावरही विशेष भर देण्यात आला.
याशिवाय प्रा. तीर्था सोमण यांनी गणित विषयाचे प्रशिक्षण घेतले. यामध्ये संकल्पनांचे पुनरावलोकन, प्रश्न सोडवण्याच्या पद्धती आणि सराव प्रश्नांचा समावेश होता. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना एमसीए अभ्यासक्रमाची व्याप्ती, पुढील करिअरमधील संधी आणि त्याचे महत्त्व याबाबतही माहिती देण्यात आली. तसेच महाराष्ट्र एमसीए सीईटी अर्ज प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. ही कार्यशाळा डॉ. कौशल प्रसाद व विभागप्रमुख प्रा. तेजस जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कार्यशाळेचे आयोजन प्रा. सानिका जोशी यांनी केले. कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला असून, या उपक्रमामुळे परीक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशा मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.