कोकण

-शिवजयंती

CD

-rat१९p११.jpg-
P२६O२५६२४
चिपळूण ः शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक रिक्षा मित्रमंडळातर्फे रिक्षा व्यावसायिकांनी मोफत प्रवासी वाहतूक सेवा उपक्रम राबवला.
----
चिपळुणात मोफत प्रवासी वाहतुकीद्वारे मानवंदना
शिवजयंती निमित्त रिक्षा व्यावसायिकांचा अभिनव उपक्रम; शिवजयंतीनिमित्त कार्यवाही
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक रिक्षा मित्रमंडळातर्फे रिक्षा व्यावसायिकांनी मोफत प्रवासी वाहतूक सेवा सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शहरात या सेवेमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंडळाचे अध्यक्ष विनायक रेडीज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. सध्या रिक्षास्टॉपवर एकूण ५० रिक्षा कार्यरत असून, त्यापैकी १५ रिक्षा व्यावसायिकांनी स्वखुशीने या सेवेत सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी केवळ एका रिक्षा व्यावसायिकाने ही सेवा सुरू केली होती. त्याच प्रेरणेतून यावर्षी तब्बल १५ ‘शिलेदार’ या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
शिवजयंतीच्या दिवशी सकाळी ९ ते ७ वाजेपर्यंत चिपळूण शहरमर्यादीत ही मोफत सेवा उपलब्ध आहे. या सेवेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे. याबाबत रिक्षा व्यावसायिक अमोल जाधव यांनी सांगितले, या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील वर्षी सर्व रिक्षा व्यावसायिकांनी एकत्र येऊन हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवावा, अशी इच्छा व्यक्त होत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी झाली.


- rat१९p५.jpg -
OP२६O२५५९८
संगमेश्वर ः शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी विद्यार्थी.
(छाया : मिनार झगडे, संगमेश्वर)
-----
*संगमेश्वरात पारंपरिक पोशाखात मिरवणूक

संगमेश्वर ः संगमेश्वर येथील पैसाफंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह प्रशालेतील सर्व कर्मचाऱ्यांनी आज संगमेश्वर बाजारपेठेतून ढोलताशांच्या गजरात आणि लेझीम नृत्याच्या साथीने शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत हर हर महादेव अशा घोषणा देत ही मिरवणूक संगमेश्वर बाजारपेठेत आली. त्या वेळी व्यापारी आणि ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात मिरवणुकीचे स्वागत केले. मिरवणुकीच्या अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात तसेच स्वराज्याचे मावळे बनून विद्यार्थी सहभागी झाले होते. या मिरवणुकीचे संगमेश्वर येथील व्यापारीर्ग, ग्रामस्थ, पालकांनी कौतुक केले.
---
-rat१९p१२.JPG-
P२६O२५६२५
चिपळूण ः शिवजयंतीनिमित्ताने पारंपरिक पोषाख परिधान केलेले रिगलचे विद्यार्थी.
--
*चिपळुणात ‘शिवगर्जना’ सादर
चिपळूण ः छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष आहेत. शिवाजी महाराजांचे विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून, आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. महाराजांचे कौशल्य नियोजन, व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवीत. स्वयंशिस्त अंगीकारली पाहिजेत. प्रत्येक विद्यार्थ्याने शिवचरित्र वाचले पाहिजे, असे प्रतिपादन रिगल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ. सुमिता शिर्के यांनी व्यक्त केले. कोंढे येथील सीबीएसई स्कूल येथे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात देशभक्तिपर वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण परिसर भगव्या पताका, आकर्षक रांगोळ्या आणि शिवकालीन सजावटीने नटला होता. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्री-प्रायमरीच्या चिमुकल्या रूद्र कामेरकरने, सहावीतील द्रिती पाटील, पाचवीतील रूंजी सावंत व ओवी हेलेकरने जोशपूर्ण ‘शिवगर्जना’ सादर केली. पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पाळणा नृत्याने कार्यक्रमात सांस्कृतिक रंग भरला. पारंपरिक पोशाखात आणि सुरेल संगीताच्या तालावर सादर झालेल्या या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर आणि प्रेरणादायी गाणे सादर केले. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला दमदार आणि जोशपूर्ण पोवाडा मुख्य आकर्षण ठरला.
----
-rat१९p१७.jpg-
२६O२५६३८
मंडणगड : शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमांत आपली कलाकौशल्ये सादर करताना शाळेच्या विद्यार्थिनी.

*मंडणगडात जय शिवाजी जय भवानी... चा जयघोष
मंडणगड ः मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मंडणगड येथे शिवजयंती उत्साहपूर्ण आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. जय शिवाजी जय भवानीच्या घोषणांनी संपूर्ण विद्यालय परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष दिलीप जगताप, चिटणीस संतोष मांढरे, मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे, शिक्षक प्रतिनिधी राजकुमार सूर्यवंशी, बसवंत शिरगिरे उपस्थित होते. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी शिवज्योत व शिवपालखी मिरवणुकीत सहभाग घेतला. लहान मुलांनी शिवरायांचा वेश परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जयंतीनिमित्त विद्यालयातील १५ विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. कार्याध्यक्ष दिलीप जगताप यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट भाषणांचे कौतुक करत प्रत्येक विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्याची घोषणा केली.
-----------
rat१९p१५.jpg-
P२६O२५६३२
चिपळूण ः शिवजयंतीनिमित्त आणण्यात आलेल्या शिवज्योतीचे स्वागत करताना शहराचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ. शेजारी नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर.

चिपळुणात शिवज्योतीचे स्वागत
चिपळूण ः सातारा येथील अजिंक्यतारा किल्ला सातारा येथून शिवज्योत चिपळूणमध्ये आणण्यात आली. तालुका स्पोर्ट अॅकॅडमी प्रमुख मंगेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर पवन तलाव परिसरात तिचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली. चिपळूण पालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवज्योतीचे औपचारिक स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शिवज्योत स्वीकारली. या वेळी मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, आरोग्य सभापती शुभम पिसे तसेच नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
----
रत्नागिरीतील नवनिर्माण महाविद्यालय ‘शिवमय’
रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षणसंस्था रत्नागिरीतील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विधी कापडी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रकट करणारा बहारदार पोवाडा सादर केला. या निमित्ताने महाविद्यालयातील अनुश्री साळवी, ऋचा पवार, निखत मालगुंडकर, आयेशा सावकार, इफत ठाकूर या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त मनोगतं व्यक्त केली. प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी महाराजांच्या कार्याची माहिती दिली.
-----
चिपळूण पालिकेतर्फे शिवजयंती
चिपळूण : येथील पालिकेतर्फे शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी पालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, आरोग्य सभापती शुभम पिसे तसेच नगरसेवक फैसल कासकर, विकी नरळकर, विकी लवेकर, निलम जाधव, उदय जुवळे, वैशाली कदम, राणी महाडिक, प्रमोद बुरटे, हर्षाली पवार, शहनाज वांगडे, कपिल शिर्के, रोहित खाडे यांच्यासह नगर पालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर मार्कंडी येथील अश्वारूढ पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. ध्वनिक्षेपकावरून गीते व पोवाडे प्रसारित करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT