कोकण

दापोली -टाळसुरे महाविद्यालयाला अ प्लस दर्जा

CD

टाळसुरे महाविद्यालयाला ‘अ’ प्लस दर्जा
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २० ः दापोली तालुक्यातील टाळसुरे येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी शाळा गुणवत्ता मुल्यांकनात विद्यालयाला ‘अ प्लस’ दर्जा प्रदान केला आहे.
शासनाने राज्यातील सर्व माध्यम व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा तयार केला होता. त्यानुसार शाळांना स्वयंमूल्यांकनासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्यातील १ लाख २ हजार ६७५ शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केले. त्यापैकी १० हजार ७१२ शाळांची बाह्यमूल्यांकनासाठी निवड करण्यात आली आणि १० हजार ६४४ शाळांचे बाह्यमूल्यांकन पूर्ण झाले. या प्रक्रियेनंतर राज्यातील केवळ ४२९ शाळांना ‘अ प्लस’ श्रेणी प्रदान केली असून, त्यामध्ये टाळसुरे येथील या विद्यालयाचा समावेश आहे.
विद्यालयाने यापूर्वी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात २०२४-२५ मध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून ५ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. या यशाबद्दल सह्याद्री शिक्षणसंस्था सावर्डेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, संचालक शांताराम खानविलकर, शालेय समितीचे अध्यक्ष जयवंत जालगावकर आदी मान्यवरांनी मुख्याध्यापक संदेश राऊत, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT