कोकण

संक्षिप्त

CD

पोफळी प्रशालेत
शिवजन्मोत्सव साजरा
चिपळूणः पोफळी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात किल्ले भैरवगड-पाटण येथून आणलेली शिवज्योत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ढोलताशा व झांजपथकाच्या गजरात शिवमूर्तीचे आगमन झाल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या प्रसंगी कलाशिक्षक प्रथमेश विचारे यांनी आरतीचे गायन केले. या वेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक महेंद्र कापडी, शिशूविहारप्रमुख सुप्रिया वारे, शिवधर्म प्रतिष्ठानचे सदस्य नितीन बामणे, जितेंद्र कदम, अवधूत शिर्के, रोहन कांगणे हे उपस्थित होते. या वेळी प्राथमिक विभागातील अद्विक पवार, अद्विका भुजबळ, मनस्वी कुचेकर, ध्रुवी पवार, राफिया सय्यद तर माध्यमिक विभागातील मंथन नलावडे, प्रतीक गुळवे व उमिका बेंदरकर या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी भाषणे केली. विलास मायनाक यांनी शिवगीत सादर केले. सूत्रसंचालक प्रदीप कुमार यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक महेंद्र कापडी यांनी आभार मानले.

-----------
पूर्णगड शाळेत
शिवजयंती कार्यक्रम
पावस ः तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पूर्णगड नं. १ या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रॅली काढून ढोलताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. विद्यार्थ्यांनी विविध लेझिम नृत्याचे विविध प्रकार सादर केले तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गीतगायन करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी उत्तम माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT