कोकण

चिपळूण-पवित्र रमजान महिन्याला सुरुवात

CD

पवित्र रमजान महिन्याला सुरवात
चिपळूण, ता. २० ः जिल्ह्यात बुधवारी (ता. १८) सायंकाळी ‘मगरीब’च्या नमाजनंतर चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. रात्री शहर आणि परिसरातील सर्वच मशिदींमध्ये ''तरावीह''च्या विशेष नमाजला सुरवात झाली.
जिल्ह्यातील सर्व मशिदींमध्ये पवित्र धर्मग्रंथातील पारे (अध्याय) वाचन सुरू झाले आहे. गुरूवारी पहाटे रोजेदार बांधवांनी सहरी केली. त्यानंतर पहिला रोजा सुरू झाला. रमजान महिना अत्यंत ‘बरकत’वाला असतो. या महिन्यात ३० दिवस रोजे ठेवण्याचा आदेश आहे. रोजा या शब्दाला अरबी भाषेत ''सौम'' म्हणतात, त्याचा अर्थ थांबणे असा होतो. सूर्योदय होण्यापूर्वीपासून सूर्यास्तापर्यंत खाणे-पिणे आणि शारीरिक गरजा न भागवणे ज्यामुळे सृष्टीचा पालनहार त्यावर खुश झाला पाहिजे. रोजा श्रीमंत आणि गरीब दोघांनाही ठेवावा लागतो. श्रीमंत व्यक्तीला रोजा ठेवल्यावर एक गरीब कसा राहत असेल याची जाणीव व्हावी हा सुद्धा दृष्टिकोन त्यामागचा आहे.
मागील दोन आठवड्यांपासून शहरात रमजान महिन्याची जोरदार तयारी सुरू होती. शहरातील सर्वच मशिदींमध्ये रंगरंगोटी करण्यात आली. बुधवारी सायंकाळी ''मगरीब''च्या नमाजानंतर चंद्रदर्शन झाल्याची घोषणा करण्यात आली. बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर रात्री ''इशां''च्या नमाजनंतर शहरातील विविध मशिदींमध्ये ''तरावीह''च्या विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले.

चौकट
पाच वेळा नमाज अदा
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव पाचवेळा नमाज अदा करतात याशिवाय रात्रीच्या प्रार्थनेवेळी तरावीहची विशेष नमाज अदा करायची असते. तिसरे तत्त्व म्हणजे ‘उपवास’, याला इस्लाममध्ये रमजानचे रोजे असे म्हणतात. सर्वच धर्मांत उपवास सांगितले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT