कोकण

रत्नगिरी-जिल्ह्यात नवीन २१ रेशन दुकानांना मंजूरी

CD

26064

जिल्ह्यात नवीन २१ रेशन दुकानांना मंजुरी
जिल्हा पुरवठा विभाग; सध्या ९४९ रेशन दुकाने, गावातच मिळणार धान्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २०ः जिल्ह्यातील विविध तालुक्यात नव्याने रेशन दुकान मंजुरीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे आले होते. त्यापैकी २१ नव्या रेशनदुकांनाना मंजुरी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात ९४९ रेशन दुकाने सुरू असून, त्यात आणखी २१ रेशन दुकाने वाढणार आहेत. सर्वाधिक मंजुरी रत्नागिरी तालुका आणि खेड तालुक्यातील दुकानांना मंजुरी देण्यात आली आहे. मंडणगडात एकाच ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब, अंत्योदयमधील लाभार्थ्यांना वेळेत, सुरळीत धान्य देण्यात यावे म्हणून जिल्हा पुरवठा विभाग काम करत आहे. जिल्ह्यात रास्त भाव दुकानांसाठी २०२५ साठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यापैकी २१ अर्जांना मंजुरी देण्यात आली असून, लवकरच नव्याने मंजुरी झालेली रेशन दुकाने लवकरच सुरू होणार आहेत. रत्नागिरी तालुक्यातील देऊड, पिंळवाडी २, चवे ३, फणसवणे (गुरववाडी), तुरळ (हरेकरवाडी) प्रत्येक एक, मंडणगडात उंबरशेत, राजापूर खरवते, चिपळूणमध्ये मार्गताम्हाणे बुद्रुक, दापोली तालुक्यात पणदेरी, दापोली ३, शिरसोली येथे प्रत्येक एक, गुहागरात निगुंडळ, असोर येथे प्रत्येकी एक, खेड तालुक्यात भिलारे आयनी, खोपी, तुळशी बु., करटेल येथे प्रत्येक एक, कशेड येथे दोन असे एकूण २१ नव्या रेशन दुकानांना मंजुरी देण्यात आली आहे.

कोट
जिल्ह्यात रास्त भाव धान्य दुकानासाठी नव्याने अर्ज मागवण्यात आले होते. आलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये २१ नव्या रेशन दुकानांना मंजुरी देण्यात आली आहे. अद्याप फी भरणे अनामत रक्कम भरणे या कारणाने सुरू झाली नाही. या संदर्भातील कार्यवाही लवकरच सुरू होईल.
- रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी

चौकट
मंजूर दुकानांची यादी

तालुका संख्या

चिपळूण ०१
दापोली ०३
गुहागर ०२
खेड ०४
मंडणगड ०१
राजापूर ०१
रत्नागिरी ०७
---------------------
एकूण २१
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT