26022
पाककला स्पर्धेमध्ये पौर्णिमा मांगले प्रथम
कणकवली, ता. २० : शहरातील महापुरुष मित्रमंडळाच्या पाककला स्पर्धेत पौर्णिमा मांगले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. शिल्पा मानकर यांनी द्वितीय, तर सोनाली पारकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिक तृप्ती मुंज, लक्ष्मी मेनकुदळे, सुलभा वाळके व स्वाती पोरे यांनी प्राप्त केले. स्पर्धेचे परीक्षण वसुधा माने यांनी केले.
शहरातील श्री देव महापुरुष मंदिर यांच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त पाककला स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर यांनी केले, तर स्पर्धेचे परीक्षक वसुधा माने यांनी केले. या कार्यक्रमावेळी नगरसेविका सुमेधा अंधारी, अॅड. चैताली मुंज, वैशाली काणेकर, शीतल सापळे, मनीषा सापळे, शिल्पा मानकर, स्नेहा अंधारी, प्रीती कोरगावकर, दीप्ती उचले, सौ. मांगले, तृप्ती सापळे, किरण पारकर, साक्षी अंधारी, माधवी घेवारी, सानवी अंधारी, दुर्वा मानकर, सावी अंधारी, सिद्धी वाळके, सिमरन बजाजी, देविका चव्हाण, अक्षता उचले-शेटे, आरती सावंत आदी उपस्थित होत्या. पाककला स्पर्धेत ३१ महिलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, राजा राजाध्यक्ष, ज्येष्ठ व्यापारी विजय पारकर व बाळा सापळे यांनी विशेष मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.