कोकण

रघुनाथ नाईक यांचे निधन

CD

26056

रघुनाथ नाईक
यांचे निधन
कुडाळ, ता. २० : बिबवणे-नाईकवाडी येथील रहिवासी व नेरुर येथील श्री कलेश्वर विद्यामंदिराचे निवृत शिक्षक रघुनाथ उर्फ बबन वासुदेव नाईक (वय ६९) यांचे निधन झाले. नाईक यांनी प्रथम मांडकुली-केरवडे येथील प.पू. आप्पासाहेब पटवर्धन विद्यालयात तीन वर्षे अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर नेरुर येथील श्री कलेश्वर विद्यामंदिरात क्रीडा शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले. तेथे त्यांनी अध्यापनाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही चांगले विद्यार्थी घडविले. तालुका शालेय क्रीडा असोसिएशनचे अध्यक्षपद, बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, सून, तीन भाऊ, भावजया, पुतणे असा परिवार आहे. बिबवणे येथील सामाजिक कार्यकर्ते रोहन नाईक, व्हॉलीबॉलपटू रोहित नाईक यांचे ते वडील, निवृत्त शिक्षक शरद नाईक यांचे बंधू होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT