कोकण

देवगडातील चार वर्षीय मुलीवर यशस्वी ह्रदयरोग शस्त्रक्रिया

CD

देवगडातील चार वर्षीय मुलीवर
यशस्वी ह्रदयरोग शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० : तालुक्यातील एका चार वर्षीय मुलीवर जन्मजात हृदयरोगासाठी शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ती आता पूर्णपणे ठणठणीत असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.
याबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. एका अंगणवाडीतील आरोग्य तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली पोकळे आणि डॉ. अमित कोळी यांनी संबंधित मुलीच्या आजाराचे प्राथमिक निदान केले. पुढे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हृदयविकार तपासणी शिबिरात तिच्या जन्मजात हृदयविकाराचे निश्चित निदान करण्यात आले. शस्त्रक्रिया धोकादायक असल्याच्या भीतीने तिचे आई-वडील व आजी-आजोबा सुरुवातीला तयार नव्हते; मात्र डॉ. पोकळे यांच्यासह पथकाने सुमारे वर्षभर सातत्याने समुपदेशन करून कुटुंबीयांना आजाराची गंभीरता व उपचाराचे महत्त्व पटवून दिल्यानंतर कुटुंबियांनी शस्त्रक्रियेस संमती दर्शवली. मुंबईतील एका रुग्णालयात मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होऊ लागली असून ती आता निरोगी आणि सक्रिय आहे. तिचे वजनही वाढून वयानुसार सामान्य झाल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. या यशस्वी उपचाराबद्दल कुटुंबीयांनी पथकाचे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश पाटोदेकर यांचे आभार मानले. या घटनेमुळे लवकर निदान, सातत्यपूर्ण समुपदेशन आणि वेळेवर उपचार यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT