कोकण

गणिताची गोडी, यशाची जोडी

CD

26119

गणिताची गोडी, यशाची जोडी

गोगटे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे शिरोड्यात शिष्यवृत्ती मार्गदर्शन


शिरोडा, ता. २१ : आजगाव येथील पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान गेली पाच वर्षे शैक्षणिक कार्य करीत आहे. यावर्षी देखील शिरोडा येथील र.ग. खटखटे ग्रंथालयात आठवीसाठी व आजगाव येथे पाचवीसाठी विनामोबदला शिष्यवृत्ती मार्गदर्शन करण्यात आले. या दोन्ही वर्गात मिळून गेल्या चार महिन्यांत सुमारे दीडशे तास मार्गदर्शन करण्यात आले.
मार्गदर्शन वर्गाच्या सांगता कार्यक्रमावेळी प्रांजल सावंत, प्राची गवंडी व प्रथमेश रेडकर या विद्यार्थ्यांनी तर, चार पालकांनी मनोगत व्यक्त केले. गणित विषय सोपा करून सांगण्याची हातोटी, सराव आणि परीक्षेविषयीची भीती दूर करण्याची पद्धती भावल्याचे सर्वांनीच सांगितले. शैक्षणिक मार्गदर्शन यापुढेही चालू ठेवण्याची विनंती पालकांनी केली. प्रमुख मार्गदर्शक विनय सौदागर यांनी ही विनंती मान्य करून सातवीसाठी ५ मार्च ते २४ एप्रिल असे क्लास चालू रहातील, असे सांगितले. मार्गदर्शन वर्गासाठी र.ग.खटखटे ग्रंथालयाचे पूर्ण सहकार्य लाभले. तसेच प्रा. नीलम कांबळे व सौ. वैभवी नाटेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
खटखटे ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्या हस्ते मुलांना वही व पेन भेट दिला. एकूण पाचवी व आठवीच्या मिळून १४ मुलांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला व सातवीची ७ मुले अद्याप लाभ घेत आहेत. सांगताप्रसंगी सरोज रेडकर व प्रकाश मिशाळ यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीप पांढरे व एकनाथ शेटकर यानी शुभेच्छा दिल्या. ग्रंथपाल प्राची पालयेकर व सहायक लिना परब यांचे सहकार्य लाभले. ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT