कोकण

शहराचा सोमवारी पाणीपुरवठा बंद

CD

रत्नागिरीचा उद्या पाणीपुरवठा बंद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : शहरातील नागरिकांना नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत आवाहन केले आहे. हाती घेण्यात आलेल्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे सोमवारी (ता. २३) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नगरपालिकेने आज या संदर्भात अधिकृत सूचना जारी केली आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रतिबंधात्मक देखभाल आणि दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. भविष्यात ऐन उन्हाळ्यात तांत्रिक बिघाड होऊन पाणीटंचाई भासू नये यासाठी ही ‘प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स’ मोहीम राबवली जात आहे. या कामासाठी जलवाहिन्या आणि पंपिंग स्टेशनवरील यंत्रणेची तपासणी केली जाणार आहे. सोमवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने मंगळवारी सकाळीदेखील पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पाणी काटकसरीने आणि जपून वापरा आणि देखभाल दुरुस्तीच्या कामात पालिका प्रशासनास सहकार्य करा.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Expressway Protest: निवडणुका झाल्यानंतर शक्तिपीठ रेटण्याचा प्रयत्न, सतेज पाटील, राजू शेट्टी, करणार राज्यभर आंदोलन

Solapur : मारायचं होतं सासूला, पण पतीचा मृत्यू; प्रेमप्रकरणातून विषप्रयोग, पत्नी अन् प्रियकराला अटक

Latest Marathi News Live Update : राजापूर किनाऱ्यावर स्फोटासारख्या आवाजांमुळे खळबळ; टगबोटीवरील सिग्नल पिस्टल फायरिंगचा प्रकार उघड

ट्रकची पोलिसांच्या गाडीला धडक, ५ जणांचा मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर

Suryakumar Yadav: भारतीय संघाच्या तयारीवर सूर्यकुमार यादवचा विश्वास; अभिषेक शर्माच्या फटाक्याची तयारी

SCROLL FOR NEXT