कोकण

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये संगमेश्वरचे यश

CD

-rat२१p७.jpg-
P२६O२६१७६
रत्नागिरी ः जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यशस्वी झालेले संगमेश्वर तालुक्यातील खेळाडू.
----
संगमेश्वर तालुक्यास उपविजेतेपद
तायक्वांदो स्पर्धा ; फ्रीस्टाईल पुमसे’मध्ये तिसरा क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २१ ः रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित १९व्या जिल्हास्तरीय क्युरोगी व १३व्या पुमसे स्पर्धेत संगमेश्वर तालुक्याच्या खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी केली आहे. या स्पर्धेत संगमेश्वर तालुक्याने ‘पुमसे’ प्रकारात द्वितीय तर फ्रीस्टाईल पुमसे’मध्ये तृतीय क्रमांकाचा चषक पटकावून जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले.
रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून सुमारे ६०० खेळाडू सहभागी झाले होते. जिल्हाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कर्रा, सचिव लक्ष्मण के., शशांक घडशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा उत्साहात पार पडली. संगमेश्वर तालुक्याच्यावतीने नगरपंचायत देवरूख तायक्वांदो क्लबच्या खेळाडूंनी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये रितीशा कांगणे (सबज्युनियर) आणि साहिल जागुष्टे (कॅडेट) यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावत ‘बेस्ट फायटर’ चा मान मिळवला. रितीशा कांगणे, ईश्वरी कांगणे, साहिल जागुष्टे, ओम घाग, पूर्वा वनकर, नक्षत्रा शिंदे, शौर्य माळी, ईशान भागवत, ऋतिक कांगणे, वेदांत मसुरकर, सोमांश सावंत, सुमीत पवार आणि मयूरी राऊत, निकुंज घडशी, सई संसारे, अवनी भिंगार्डे, मंथन चव्हाण, शौनक राजवाडे, गंधार रेवडेकर, अजिंक्य शिंदे, आदित्य चिपळूणकर, सुमीत पवार, गंधर्व शेट्ये आणि दक्षसिंग राठोड यांनी पदकांची कमाई केली. यशस्वी खेळाडूंचा सत्कार देवरूख येथे नवनिर्वाचित नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT