कोकण

नूतन लोकप्रतिनिधींचा सत्कार

CD

२६१८५

नूतन लोकप्रतिनिधींचा सत्कार
सावंतवाडी आयोजन : मराठा महासंघाचा उपक्रम
सावंतवाडी, ता. २१ : अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे नूतन जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जात, पात, धर्मभेद केला नाही. त्यांनी सर्वांनी एकत्र घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याची स्थापन केली. त्यांच्या विचारांने आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करूयात. अखिल भारतीय मराठा महासंघाचा हा भव्यदिव्य उपक्रम पुढे १०० वर्ष चालू राहील, या दृष्टीने महासंघाने कार्य करावे, त्यासाठी आम्हा सर्वांचे सहकार्य राहील, असा विश्वास यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा शहरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन माजी नगराध्यक्ष परब यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर युवराज लखमराजे भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, नगरसेवक अजय गोंदावळे, निरज देसाई, विद्याधर परब, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत, पुंडलिक दळवी, दिगंबर नाईक, विशाल सावंत, मनोज घाटकर, संजय लाड आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर म्हणाले,‌ ‘सावंतवाडीतील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानची मोकळी जागा शहरातील विविध मंडळांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी विना मोबदला देण्यासाठी व्यवस्था लवकरच केली जाईल. त्यासाठीचा ठराव बैठकीत घेण्यात येईल.’
याप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, मायकल डिसोजा, नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर, उत्कर्षा गांवकर, प्रणाली टिळवे, मायकल डिसोजा, प्रथमेश सावंत, नगरसेवक अजय गोंदावळे, स्नेहा नाईक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT