कोकण

नव्याने मंजूर वीज वाहिनी उभारा

CD

26199

नव्याने मंजूर वीज वाहिनी उभारा

मडुरा येथे ठराव; उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पडसाद

बांदा, ता. २१ : नव्याने जोडणी केलेली ११ केव्ही विद्युत वाहिनी आहे त्याच बाजूने ठेवावी. संरक्षणाच्या दृष्टीने संपूर्ण लाईनला गार्डिंग करावे. प्रितेश गवंडी यांच्या गॅरेजसमोरील वाहिनीला महावितरणने सुरक्षेच्या दृष्टीने कोटिंग करून द्यावे. गावात पावसाळ्यात होणाऱ्या वीज समस्यांमुळे वारंवार पाठपुरावा करून हे काम मंजूर झाले आहे. गावाबाहेरील उपोषणकर्त्यांची प्रशासनाने दखल घेऊ नये, असा ठराव मडुरा ग्रामसभेत संमत करण्यात आला.
मडुरा ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा सरपंच उदय चिंदरकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ग्रामपंचायत सभागृहात झाली. यावेळी उपसरपंच बाळू गावडे, ग्रामपंचायत सदस्य अमोल मेस्त्री, तुकाराम जाधव, स्वप्नाली परब, पल्लवी सातार्डेकर, संचिता धुरी, मीरा प्रभू, ग्रामसेवक प्रसाद ठाकूर उपस्थित होते.
मडुरा, कास व सातोसे गावांना वीजपुरवठा करणारी वाहिनी कास जंगलमय भागातून जात असल्यामुळे पावसाळ्यात वारंवार वीज समस्यांना सामोरे जावे लागत होते. यावर उपाय म्हणून निगुडे, रोणापालमार्गे सातोसे दरम्यान नव्याने लाईन जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. मडुरा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रितेश गवंडी यांच्या गॅरेजसमोरून वाहिनी गेल्याने त्यांनी या विरोधात आक्षेप नोंदवत कायदेशीर लढा सुरू केला. सध्या त्यांचे माजगाव येथील सहकारी सतीश चौगुले यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.
ग्रामसभेत ग्रामसेवक प्रसाद ठाकूर यांनी महावितरणच्या पत्राचे वाचन केले. त्यात गवंडी यांच्या गॅरेजसमोर कोटिंग करण्याचा प्रस्ताव महावितरणने ठेवला होता; मात्र गवंडी यांनी तो अमान्य करीत गॅरेजच्या विरुद्ध दिशेनेच वीज वाहिनी नेण्याची मागणी करीत महावितरणच्या विरोधात उपोषण छेडले आहे. ग्रामसभेत याचे पडसाद उमटले. यावेळी विविध विकासकामांवर चर्चा झाली.
------
‘गावाबाहेरील व्यक्ती समस्येबाबत अनभिज्ञ’
गावात वीज समस्या उद्‌भवत असल्याने स्थानिकांनी रस्त्याच्या बाजूने वीज वाहिनी नेण्याची मागणी केली होती. गावाबाहेरील व्यक्तीला माहीत आहे काय पावसाळ्यातील व्यथा? असा प्रश्न उल्हास परब यांनी उपस्थित केला. स्थानिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन सर्व लाईनला गार्डिंग करावे, अशी मागणी केली. यावेळी माजी उपसरपंच विजय वालावलकर, संदीप परब, नकुळ परब, रामा परब, सुभाष परब यांनी चर्चेत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana : चिखला गावात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना, शिवभक्तांनी शनिवारी रात्री बसवला पुतळा; पाहा VIDEO

Santosh Deshmukh Case: खटल्यातील विलंबामुळे सरकारी पक्षाला तंबी; संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी

Ramadan 2026: रमजानमध्ये इबादत, शांती आणि सवाबाचा अनुभव घ्यायचा आहे? भारतातील 'या' मशिदींना नक्की भेट द्या

Latest Marathi News Live Update : काही तपासण्या करण्यासाठी शरद पवार यांना रुबी हॉस्पिटलला आणलंय : सुप्रिया सुळे

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT