गोव्यात २४ ला मच्छीमार संमेलन
मालवण, ता. २१ : विकसित भारताच्या उभारणीत मच्छीमार बांधवांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. या योगदानाला आधुनिक विज्ञानाची आणि प्रगत तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी, जागतिक महासागर विज्ञान सभा २०२६ अंतर्गत २४ ला गोवा येथे मच्छीमार संमेलनाचे आयोजन केले आहे. श्रमिक मच्छीमार संघाचे रविकिरण तोरसकर यांनी ही माहिती दिली.
मच्छीमार समाजाला आधुनिक विज्ञानाशी जोडणे आणि मासेमारीसाठी उपयुक्त असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे हे या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. बदलत्या काळात समुद्रातील आव्हाने समजून घेऊन शाश्वत मत्स्य व्यवसायाकडे पाऊल टाकण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे संमेलन विविध नामांकित संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे. यात विज्ञान भारती आणि सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थान, गोवा. राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र, गोवा. गोवा विद्यापीठ आणि भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र, हैदराबाद. सागरी सीमा मंच आणि रिलायन्स फाउंडेशन. मत्स्यव्यवसाय विभाग, गोवा सरकार यांचा समावेश आहे.
या संमेलनात महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांतील १०० मच्छीमार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक ३० मच्छीमार, मत्स्यव्यावसायिक आणि सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, सागरी विज्ञान आणि मासेमारी विषयावर सातत्याने लेखन करणारे मालवणचे पत्रकारही संमेलनात सहभागी होऊन मासेमारीतील समस्या आणि विज्ञान यावर चर्चा करणार आहेत. या संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मच्छीमार बांधवांनी आणि प्रतिनिधींनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन तोरसकर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.