rat22p2.jpg-
26323
रत्नागिरी : झेप फाउंडेशनच्या निबंध स्पर्धेतील विजेतीला बक्षीस देताना दादा ढेकणे. सोबत मान्यवर.
झेप फाऊंडेशनच्या निबंध स्पर्धेत
दुर्वा मुरूडकर, राधिका तोडणकर प्रथम
रत्नागिरी, ता. २१ : झेप फाऊंडेशनच्या वतीने आयोजित रत्नागिरी तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण सोहळा पटवर्धन हायस्कुलच्या सभागृहात उत्साहात पार पडला. छोटया गटातून दुर्वा मंगेश मुरूडकर व मोठया गटातून राधिका शैलेंद्र तोडणकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
संस्थेचे अध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी श्री. सुर्यवंशी, डाएटच्या वरिष्ठ अधिव्याख्यात्या दीपाली सावंत, नगरसेविका सौ. वर्षा ढेकणे आदी उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
छोट्या गटात प्रथम दुर्वा मंगेश मुरूडकर (फाटक हायस्कूल), द्वितीय त्रिशा चंद्रशेखर तांबे (शिर्के हायस्कुल), तृतीय क्रियांश संतोष गोरिवले (सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय) व मोठ्या गटात प्रथम राधिका शैलेंद्र तोडणकर (पटवर्धन हायस्कुल), व्दितीय श्रावणी भुजंग पाटील (कुर्धे हायस्कुल), तृतीय विरश्री निलम कानडे (पटवर्धन हायस्कुल) यांनी यश मिळवले.
श्री. सुर्यवंशी, श्रीमती सावंत, संस्थेचे सल्लागार विनायक हातखंबकर यांनी संस्थेच्या उपक्रमाचे विशेष कौतुक करून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव सुनिल पवार यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष सचिन गांधी, खजिनदार सौ. वर्षा ढेकणे, सहखजिनदार व कायदेशीर सल्लागार अॅड. मिलिंद मयेकर, सदस्य रूपेश खेडेकर, सौ. समृध्दी म्हादे, प्रणाली मेस्त्री उपस्थित होते.
-- बातमीदार- मकरंद पटवर्धन... २२.१.२०२६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.