26386
सावंतवाडीत दिनेश नागवेकरांचा सत्कार
सावंतवाडी ः सावंतवाडी दोडामार्ग तालुका निवृत्त कर्मचारी संघाकडून संघटनेचे सदस्य सनदी अभियंता, वास्तुविशारद आणि स्थावर संपदा विकासक डॉ. दिनेश नागवेकर यांचा सत्कार माजी शालेय शिक्षण मंत्री व सावंतवाडीचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते आणि सावंतवाडी नगरपालिकेचे प्रभारी अध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पणदूरकर, सचिव संभाजी कांबळे, खजिनदार सुभाष गोवेकर, जीवनरक्षा हॉस्पिटलचे डॉ. शंकर सावंत, निवृत्त उपशिक्षणाधिकारी परशुराम चव्हाण, नगरपालिकेचे आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नियोजन व पर्यावरण सभापती आनंद नेवगी, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे राजेंद्र बिर्जे, गुरुदास पेडणेकर, दत्ताराम सडेकर आदी उपस्थित होते. डॉ. नागवेकर यांनी २५ वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन बांधकाम व्यवसाय सुरू केला. वीस गृहनिर्माण संस्थांची निर्मिती करून त्यापैकी नऊ गृहनिर्माण संस्था फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी निर्माण करून त्यांना घरे उपलब्ध करून दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संघटनेच्या वार्षिक सभेत पेन्शनर्स डे निमित्त हा सत्कार करण्यात आला. मेघना राऊळ यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.