कोकण

आचऱ्यात ८ मार्चला होम मिनिस्टर स्पर्धा

CD

आचऱ्यात ८ मार्चला
होम मिनिस्टर स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २३ ः श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्चला दुपारी २.३० वाजता संस्थेचे सभासद असणाऱ्या सुहासिनींसाठी होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा ५ फेऱ्यांमध्ये असून पहिल्या फेरीपासूनच आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
या स्पर्धेतील उपविजेत्या होममिनिस्टरला अनिता आचरेकर (आचरा) यांच्याकडून सोन्याची नथ तर विजेत्या होममिनिस्टरला वैशाली देसाई (आचरा) यांच्याकडून पैठणी देण्यात येणार आहे. उपस्थित प्रेक्षक आणि विद्यार्थी वर्गासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहे. विजेत्या १० विद्यार्थ्यांना प्रज्ञा पेडणेकर (आचरा) यांच्यातर्फे आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना नेहा घाडी, सई राणे, स्वाती पेडणेकर, सानिका दुखंडे, ग्रामपंचायत सदस्या श्रुती सावंत व किशोरी आचरेकर यांच्यामार्फत आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी यांच्याकडून सर्व स्पर्धकांना व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ग्रंथपाल विनिता कांबळी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईचा विकास रखडला? बीएमसी बजेटपैकी ४८% निधी अजूनही प्रलंबित, खर्चाचे आकडे समोर

Viral Video: धक्कादायक! आईनं १०व्या मजल्याच्या बाल्कनीतून मुलाला लटकवलं; वेगळंच कारण समोर, पाहा व्हायरल व्हिडिओ

Mumbai: रस्ते आणि पुलांना नवी ओळख मिळणार! मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची नावे बदलणार; पण कोणत्या? जाणून घ्या यादी...

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

Dhule News : दोंडाईचा पोलिसांची मोठी कामगिरी! वर्णेश्वर महादेव मंदिरातील चोरीचा २४ तासांत छडा

SCROLL FOR NEXT