कोकण

खानवली गावात शिमगोत्सवाची जुनी परंपरा

CD

.
rat२३p११.jpg-
२६O२६६७०
लांजा : तालुक्यातील खानवली गावात पालखी सजवताना भाविक, ग्रामस्थ.
---
खानवलीत शिमगोत्सवाची जुनी परंपरा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : कोकणात शिमगोत्सवाचे ढोल घुमू लागले असून, गावोगावी भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. लांजा तालुक्यातील खानवली गावामध्ये शिमगोत्सवाची फार जुनी परंपरा आहे. फाल्गुन अमावस्येपर्यंत येथे विविध धार्मिक विधी, पालखी सोहळे आणि पारंपरिक कार्यक्रम रंगणार आहेत.
पालखीमध्ये नवलादेवी, धनीन, भराडीन, जाकादेवी, निनाई पावणाई, संतदेव, सांबदेव, आकार ब्राह्मणदेव, इटलाई देवी, चक्राईदेवी आदी देवदेवता विराजमान होतात. रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक कोकणी माणसाला आतुरता असणारा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शिमगा सण. ‘गाव तिथे होळी’ या परंपरेनुसार कोकणातील अनेक गावांमध्ये आज देवदेवतांना रूपे म्हणजेच मुखवटे लावण्याचा पारंपरिक सोहळा उत्साहात पार पडला.
देवदेवतांना अलंकार व पारंपरिक वस्त्रांनी सजवण्यात येते. देवींचे आकर्षक मुखवटे, मोत्याची नथ, चांदीचा करंडा, कानातील कुडी, सोन्याचे मंगळसूत्र, बुगड्या तसेच सोन्याची देवी आदी दागिने परिधान करून देवतांची शोभा वाढवली जाते. या सोहळ्याला अठरापगड जातींचा सहभाग लाभतो. पाच मानकरी म्हणून भोई, गावकर, निशाणवाले, कावडवाले, चौरीकाटीवाले आदी मानकरी पारंपरिक जबाबदाऱ्या पार पाडतात.
-----
चौकट
शिमगोत्सवाच्या निमित्ताने गावात उत्साहाचे वातावरण असून, ढोलताशांच्या गजरात पालख्या मिरवल्या जाणार आहेत. पारंपरिक श्रद्धा, एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपत खानवली गावातील शिमगोत्सव पुन्हा एकदा रंगतदार ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT