कोकण

चुकीचे निदान, उपचाराने रुग्णाच्या मृत्यूचा आरोप

CD

चुकीचे निदान, उपचाराने
रुग्णाच्या मृत्यूचा आरोप

कायदेशीर कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ : चुकीचे रोगनिदान करून चार वर्षे चुकीचे औषधोपचार झाल्याने वडिलांचा मृत्यू झाला. याला पूर्णपणे संबंधित आरोग्य यंत्रणा जबाबदार असून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसे निवेदनही त्यांना दिले आहे.
एका स्वयंसेवी संस्थेने आरोग्य शिबिरात चुकीचे निदान करून संबंधित व्यक्तीस एचआयव्ही बाधित घोषित केले आणि त्यावर गेली ४ वर्षे उपचार सुरू केल्याचा दावा संबंधित कुटुंबाने केला आहे. या प्रकारामुळे केवळ मृत्यूच नव्हे तर कुटुंबाची समाजात बदनामीही झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या मते, एका रुग्णाचे १३ नोव्हेंबर २०२५ ला निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण मूत्राशयाचा आजार, मेंदूतील रक्तस्त्राव व मेंदूत रक्ताच्या गाठी असे नमूद आहे; मात्र त्यापूर्वी आरोग्य यंत्रणेने त्यांना एचआयव्ही बाधित घोषित करून संबंधित आजारावरील उपचार सुरू केले होते, अशी माहिती नंतर समोर आली. या गंभीर निदानाबाबत त्यांच्या पत्नीला किंवा कुटुंबीयांना कोणतीही अधिकृत माहिती आरोग्य यंत्रणेकडून दिली नव्हती. एचआयव्हीसारख्या संसर्गजन्य आजाराच्या बाबतीत रुग्णाच्या कुटुंबीयांना कल्पना देणे अत्यावश्यक असताना संबंधितांनी जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे कुटुंबाच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची भीती आहे. या प्रकरणात संबंधित संस्था, निदान करणारे वैद्यकीय अधिकारी, उपचाराची चौकशी करणारे स्वयंसेवक तसेच जिल्हा रुग्णालय आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.
..................
कायदेशीर कारवाईची मागणी
ही केवळ एका व्यक्तीची शोकांतिका नाही; चुकीच्या निदानामुळे एखाद्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा अशा प्रकारांमुळे अनेक निष्पाप जीव धोक्यात येऊ शकतात, असा इशाराही दिला आहे.
..................
कोट
एचआयव्ही बाधित रुग्णाबाबत गुप्तता पाळणे हा कायदा आहे. त्याबाबत माहिती प्रसारित करता येत नाही. त्यामुळे याबाबत आवश्यक काळजी घेतली आहे व संबंधित कुटुंबाला याची माहिती दिली होती. आवश्यकतेनुसार उपचार केले आहेत. याबाबतचे रेकॉर्ड प्राप्त आहेत.
- डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT