कोकण

जंगलाची शेती करणारा पक्षी म्हणजे धनेश

CD

rat२३p१६.jpg-
P26O26717
रत्नागिरी : पक्षीमित्र संमेलनात बोलताना प्रतीक मोरे.
rat२३p२१.jpg-
P२६O२६६९९
रत्नागिरीतील किनारी आढळणारा खंड्या पक्षी.
rat२३p२२.jpg-
२६O२६६९४
सुसंस्कृत गिधाड नाटक सादर करताना कलाकार.
--------
लोगो-----पक्षीमित्र संमेलन

शिमग्यासाठी भेरलीमाड हवा तर ‘धनेश’ टिकवा
प्रतीक मोरे ः नऊ पैकी चार प्रजाती रत्नागिरीत, जंगल वाचवण्याला हवे प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : धनेश हा पक्षी अनेक वर्षे जंगलाची शेती करत आहे. त्यामुळे त्याचा अधिवास वाचवणे, त्याचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. शिमग्यासाठी भेरलीमाड हवा असेल तर धनेशाला टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मिश्रशेती करावी लागेल, शेतकऱ्यांसाठी ती फायदेशीर आहे. कृत्रिम निवासस्थान, अधिवासांचे पुनर्संचयन, सामाजिक क्लब या माध्यमातून धनेश संवर्धन करावे लागेल, असे आवाहन सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे यांनी केले.
वनविभाग आयोजित पक्षीमित्र संमेलनामध्ये ते ‘जंगलाचा शेतकरी’ या विषयावर बोलत होते. ते म्हणाले, आहे ते राखण, नव्याने रोपण करणं, जंगल वाचवणं याला सर्वांनी प्राधान्य द्यायला हवे. देशात नऊ प्रकारचे धनेश आढळतात, त्यातील चार प्रजाती रत्नागिरीमध्ये आढळतात. धनेश हा पक्षी जगातील केवळ अफ्रिका आणि आशिया या दोनच खंडात आढळतो. जंगलाचे आरोग्य तपासायचे असेल तर धनेशाची संख्या तपासली जाते.
धनेशामध्येही वधु-वरांचे मेळावे भरतात. त्यांचे आयुष्य ५० वर्षे असतं. एकदा जोडी ठरली की, नर मादीला आवडणारी फळे भेट देतो. ढोलीमध्ये जायच्याआधी त्याची साफसफाई दोघे मिळून करतात. मादी आतमध्ये गेल्यानंतर ढोलीचे दार लिंपण्यासाठी वड, पिंपळ, औदुंबर अशा फळांचा पल्प वापरला जातो. मलबार पाईड हा मातीदेखील वापरून लिंपण करतो. साठ ते नव्वद दिवस मादी अंडी उबवते त्या वेळी नर मादीसाठी चार ते पाच कि.मी. परिसरात फळे गोळा करतो. सरडे, पाली, छोटे साप यामधून प्रथिने, फळांच्या माध्यमातून पाण्याची कमतरता भरून काढतो. बेहडा, चांदफळ, काजरा, काजू, उत्रंजीवा, जांभूळ, बकूळ, जंगली काजू, बीबा अशा ४८ प्रकारच्या बिया त्याच्या विष्ठेतून पाहायला मिळातात. अशा बिजांचा प्रसार १२ कि.मी. परिसरात तो करत असतो.
दरम्यान, ‘महाधनेश’ रत्नागिरी जिल्ह्याच्या वनपर्यटनासाठी प्रमुख प्रजाती घोषित करण्यात आली. त्याचा फायदा धनेश संवर्धनाला होणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करणेही शक्य होईल, असा विश्वास पक्षिमित्रांकडून व्यक्त केला जात आहे.
-----
चौकट १
रत्नागिरीत पक्ष्यांची विविधता
‘सागरी आणि स्थलांतरित होणारे रत्नागिरीतील पक्षी’ या विषयावर विराज आठल्ये यांनी सविस्तर माहिती दिली. खरूची, उलटचोच तुतारी, सामान्य टिलवा, गळाबंद पानलावा, पानटिलवा, तणमोर, संघचारी टिटवी, छोटा चिखला अशा विविध पक्ष्यांबाबत चित्रफीत आणि छायाचित्रामधून माहिती दिली तसेच ‘रत्नागिरीतील पक्ष्यांची विविधता’ या विषयावर निकिता शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली. यात प्रामुख्याने देवराई, पाणथळ जागी आढळणाऱ्या खंड्या, पानकावळा, वटवट्या अशा कितीतरी पक्ष्यांचा समावेश होता.
-----
चौकट २
‘सुसंस्कृत गिधाड’ने जिंकली प्रेक्षकांची मने
वन्यवाणी फाउंडेशन प्रस्तुत आणि कुणिका बनसोडे-सावंत निर्मित ‘सुसंस्कृत गिधाड’ या नाटकाने संमेलनाची सांगता झाली. मकरंद सावंत यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकाने गिधाडांचे महत्त्व अधोरेखित केले. रामायणातील जटायूचा संदर्भ देत गिधाड हे शिकार न करता केवळ मृत प्राण्यांवर आपली उपजीविका करतात आणि पर्यायाने पर्यावरणाचे ‘स्वच्छतादूत’ म्हणून काम करतात, हा मोलाचा संदेश यातून देण्यात आला. डायक्लोफिनॅकच्या वापराने मृत जनावरांचे मांस खाल्ल्याने गिधाडांची संख्या कमी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT