कोकण

पान एक-सिंधुदुर्गात अवकाळीचा तडाखा

CD

26794
००००००००

सिंधुदुर्गाला अवकाळीचा तडाखा

फोंडाघाटाला झोडपले; आंबा-काजूचे नुकसान अटळ

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २३ : आधीच मोहोर करपल्यामुळे अडचणीत आलेल्या जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकांना आता अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. फोंडाघाट परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले, तर दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांच्या अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे उरल्या-सुरल्या आंबा-काजू पिकांचे नुकसान अटळ मानले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम रविवारी (ता. २२) सकाळपासून कोकणावर दिसून आला. वातावरणात अचानक बदल होऊन तापमानात वाढ झाली. या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही होत होती. रविवारी सायंकाळी जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाचे वातावरण तयार झाले. सायंकाळी उशिरा फोंडाघाट परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने परिसराला झोडपून काढल्याने घाट क्षेत्रात सर्वांची दाणादाण उडाली. त्यानंतर रात्रभर ढगाळ वातावरण होते. आज पहाटेपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण असून दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांत रिमझिम सुरू झाली. कुडासे, आडाळी, दोडामार्ग बाजारपेठ, डिंगणे, निरवडे, कोलगाव, मळेवाड परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. काही भागांत १० ते १५ मिनिटे पाऊस झाला.
दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यांत सध्या काजूचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे या भागातील काजू पिकाचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सर्वत्रच पावसाचे वातावरण असल्याने आंबा-काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. यावर्षी आधीच आंबा पिकात केवळ १० टक्के, तर काजूमध्ये २० टक्के फळधारणा झाली आहे. आधी मोहोर करपल्यामुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडले होते, त्यातच आता अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी पूर्णपणे धास्तावले आहेत.
....................
चौकट
सावट कायम
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आज कमी झाली. या हवामान प्रणालीमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. या प्रणालीचा मुख्य प्रभाव मध्य महाराष्ट्रावर होण्याची शक्यता असून, घाटानजीकच्या कोकण भागावरही त्याचा परिणाम जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Double Decker Bus Accident : भीषण दुर्घटना! डबलडेकर बस उलटली; पाच जणांचा मृत्यू ,१६ जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

Weather Update: दिवसा उन्हाचे चटके, रात्री बोचरा उकाडा; तापमान बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

Manchar News : आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाला ‘वसंतराव काणे आदर्श’ पुरस्कार

SCROLL FOR NEXT