कोकण

ओरोस येथे शनिवारी ‘काव्योत्सव’ संमेलन

CD

ओरोस येथे शनिवारी
‘काव्योत्सव’ संमेलन
सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या वर्षपूर्तीच्या आणि बाराव्या मासिक कार्यक्रमानिमित्त शनिवारी (ता. २८) सायंकाळी ४.३० वाजता ‘काव्योत्सव’ हे निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित केले आहे. नीलेश गावकर (साळशी), कल्पना मलये आणि श्रेयश शिंदे (कणकवली) निमंत्रित कवी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. श्री. गावकर हे शेतीमातीतील कवी आहेत. पूर्णवेळ शेती व्यवसाय करतानाच त्यांनी कोरोना काळात एकटेपणावर मात करण्यासाठी काव्यनिर्मिती सुरू केली. ते व्यासपीठीय कवी नसले तरी त्यांची अस्सल अनुभवावर आधारित कविता रसिकांना भावते. कल्पना मलये या शिक्षिका असून शैक्षणिक क्षेत्रात त्या अनेक प्रयोग करीत असतात. त्यांनी अनेक कविसंमेलनात आपली कविता सादर केली आहे. श्रेयश शिंदे हा युवा कवी कथा, लेख, नाटक, एकांकिका अशा विविध प्रकारात लेखन करतो. ‘कॉपीराईट’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.
......................
कांदळगावात आजपासून
दत्त क्षेत्र वर्धापन दिन
मालवण : कांदळगाव न्हिवे कातवड येथील श्री दत्त क्षेत्र मंदिराच्या चौदाव्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त उद्यापासून (ता. २५) दोन दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या (ता. २५) सकाळी ८ ते २ जपमंत्र पठण, मूर्ती प्रतिष्ठापना, सायंकाळी ७.३० वाजता श्री ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ न्हिवे यांचे भजन, गुरुवारी (ता. २६) सकाळी ८ वाजता पुरोहित प.पू.संत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश, श्री हनुमान, श्री गुरुदेव दत्त यांची प्राणप्रतिष्ठापना, दुपारी १२ ते १ वाजता आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ श्री गणेश भजन मंडळ वायरी यांचे भजन, सायंकाळी ७.३० वाजता स्थानिक ब्राम्हण देव प्रासादिक भजन मंडळ कातवड बुवा मंगेश नलावडे यांचे भजन, रात्री ९ वाजता अतिथी सत्कार, रात्री ९.३० वाजता संयुक्तिक दशावतार नाट्यप्रयोग ‘दत्त दर्शन’ (माया मच्छिद्रंनाथ) असे कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सीताराम चव्हाण व चव्हाण कुटुंबियांनी केले आहे.
......................
वेंगुर्ले येथे १४ मार्चला
राष्ट्रीय लोक अदालत
वेंगुर्ले ः वेंगुर्ले तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ले यांच्या विद्यमाने १४ मार्चला दिवाणी न्यायालय वेंगुर्ले येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वाद, पोटगी आदी प्रकरणे तसेच महावितरण कंपनी, दूरसंचार निगम, वित्तीय संस्था, बँका, ग्रामपंचायतांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे दाखल करून वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवावीत, यासाठी पक्षकारांनी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ले येथे संपर्क साधावा. ज्या पक्षकारांचे न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी खटले किंवा राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामपंचायतीकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी आपली प्रकरण तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ले या कार्यालयाकडे दाखल करावीत, असे आवाहन वेंगुर्ले दिवाणी न्या. एस. जे. चिवटे यांनी केले आहे.
..........................
कणकवलीत २७ ला
आरोग्य चिकित्सा
वैभववाडी ः पालकमंत्री नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी (ता. २७) उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात फिजिशियन, हृदयरोग, मेंदू विकार, बालरोग, शल्यचिकित्सक, अस्थिरोग, पोटाचे विकार, कान-नाक-घसा, दंतविकार, नेत्रविकार, त्वचारोग आदी आजारांचे विशेष तज्ज्ञांमार्फत रुग्ण तपासणी व मोफत उपचार दिले जाणार आहेत. जास्तीत जास्त गरजूंना या शिबिराचा लाभ देण्यासाठी कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रनिहाय उद्या (ता. २५) बैठकांचे आयोजन केले आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांनी केले आहे.
..........................
वेंगुर्ले अक्कलकोट
बस सेवेला प्रारंभ
वेंगुर्ले ः एसटी महामंडळाकडे काही वर्षे अक्कलकोट येथे नवीन एसटी बस सोडण्यासाठी प्रवासी ग्राहक पंचायत महासंघाचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष राधाकृष्ण वेतुरकर यांच्या मागणीच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे वेंगुर्ले आगारातून सकाळी ८.४० वाजता अक्कोलकोट येथे जाणारी बस २२ फेब्रुवारीपासून सुरू झाली. ही बस येथून सकाळी ८.४० वाजता दाभोलीमार्गे बावडा-कोल्हापूर-मिरज, सांगोला, पंढरपूर, सोलापूर अक्कलकोट अशा मार्गाने पोहोचणार आहे. परतीचा प्रवास सकाळी ८.०५ वाजता अक्कोलकोट-सोलापूर-पंढरपूर, सांगोला, मिरज, कोल्हापूर फोंडामार्गे वेंगुर्ले अशी प्रवासी सेवा देणार आहे. या मार्गावरील प्रवासी तसेच भाविकांनी या नवीन बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ले आगाराचे व्यवस्थापक नवज्योत गावडे व वेतुरकर यांनी केले आहे.
..........................
उभादांडा येथे
धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्ले ः उभादांडा येथील प्रसिद्ध श्री गणपती मंदिरातील गणेश मूर्ती विसर्जनाच्या निमित्ताने उद्या (ता. २५) दुपारी १.३० वाजता महाप्रसाद ‘म्हामणे’, गुरुवारी (ता. २६) मूर्ती विसर्जन करण्यात येणार आहे. उभादांडा गावासह वेंगुर्ले शहर व दूरदूरचे असंख्य भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. यावर्षी हा म्हामण्याचा कार्यक्रम उद्या होणार आहे. गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता गणपती मंदिर देवस्थान येथे भजन, आरती झाल्यानंतर श्री स्वयंभू सागरेश्वर मंदिरपर्यंत किनारी ढोल-ताशांच्या व भजनाच्या गजरात ‘श्रीं’च्या मूर्तीचे सागरकिनारी विसर्जन होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गणपती मंदिर देवस्थान उभादांडा, वाघेश्वरवाडी समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : आदित्य पंचोली विरोधात दाखल अत्याचार प्रकरणातील FIR रद्द करण्यासाठी 28व्यांदा सुनावणी

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT