26920
वेंगुर्लेत उधाणावर मात करत
कासव पिल्लांची सागरझेप
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २४ ः निसर्गाचा लहरीपणा आणि उधाणाच्या संकटावर मात करत वायंगणी किनाऱ्यावर कासवांच्या ५६ पिल्लांनी अथांग सागरात झेप घेतली. गतवर्षी २९ डिसेंबरला संरक्षित केलेल्या ११० अंड्यांपैकी, प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडलेल्या या पिल्लांना सोमवारी (ता. २३) सकाळी सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
कासव मित्र सुहास तोरस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अमावास्येला समुद्राला मोठे उधाण आले होते. या उधाणाचे पाणी घरट्यात शिरल्यामुळे पिल्ले जगण्याची शक्यता कमी वाटत होती; मात्र ५५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर २० फेब्रुवारीला २ आणि २१ ला ५३ अशी एकूण ५५ पिल्ले सुखरूप बाहेर आली. घरट्यात पाणी शिरल्याचा मोठा फटकाही बसला. काही अंडी नैसर्गिकरित्या खराब झाली. वनशक्तीचे अधिकारी यथार्थ खवणेकर आणि सुहास तोरस्कर यांनी या सर्व ५५ पिल्लांना समुद्रात सोडले. कांदळवन कक्षाचे अधिकारी आर.एफ.ओ. शिंगाडे आणि मुकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.