चिपळुणात २८ ला
कुंभार समाज मेळावा
चिपळूण ः तालुका कुंभार समाजाचा जाहीर मेळावा शनिवारी (ता. २८) होणार आहे. या निमित्ताने कुंभार समाजातील नवनिर्वाचित राजकीय लोकप्रतिनिधींचा गौरव केला जाणार आहे. तसेच कुंभार समाजात विशेष योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. कापसाळ येथील पाटीदार भवन येथे सकाळी ९ वाजता मेळाव्यास सुरवात होईल. या वेळी महासंघाचे संस्थापक सतीश दरेकर, कुंभार समाजाचे प्रदेशाध्यक्ष रमांकात क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. कुंभार समाजाच्या प्रगतीसाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन यथोचित सन्मान केला जाणार आहे. यामध्ये सतीश दरेकर यांना समाजरत्न, सुनील टेरवकर (सहकारभूषण), सुरेश बुरबाडकर ( व्यवसायभूषण), प्रकाश साळवी (समाजरत्न), तुकाराम साळवी ( समाजभूषण), पूनमचंद भवसार (विद्याभूषण) यांचा समावेश आहे.
-------
गुणवंत शिक्षक पुरस्कार
दामिनी भिंगार्डेंना प्रदान
संगमेश्वर : आदर्श व उत्तम मुख्याध्यापक दामिनी भिंगार्डे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी राज्यस्तरावर अनेक प्रशिक्षणात सधन व्यक्ती म्हणून काम करत असताना तालुका, जिल्हा विज्ञान मंडळात आजपर्यंत विशेष योगदान देऊन विविध उपक्रमात सहभाग घेतला आहे. लांजा तालुका विज्ञान मंडळ फिरती विज्ञान प्रयोगशाळा तसेच गरजू तसेच विशेषतः विद्यार्थी यांना आर्थिक मदत देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. दामिनी भिंगार्डे या लांजा तालुक्यातील खावडी येथील सरस्वती विद्यानिकेतन येथे कार्यरत असून, त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव म्हणून माजी विद्यार्थी मंडळ शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.