26913
नळ योजनेतील घोटाळा बाहेर काढू
संजू परब ः आतापर्यंतच्या कामावर अविश्वास
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः शहराच्या ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या कामात तज्ज्ञ अधिकारी नाही, बांधकाम विभाग काम करत आहे. झालेल्या कामावर आमचा विश्वास नाही. यात कोणी घोटाळे केले ते पुराव्यानिशी योग्य वेळी सांगेन, असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा विरोधी नगरसेवक संजू परब यांनी दिला. कुठे कुठे बैठका झाल्या, बांधकाम विभागात काय केलं, ते दाखवून देईन. लोक धूळ खात असताना प्रशासनाला काळजी नसल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वसाधारण सभेनंतर श्री. परब पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘सभेला सुटीवर असणाऱ्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले ऑनलाईन उपस्थित होत्या, तर प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर हे सभागृहात उपस्थित होते. त्यामुळे एकाच नगराध्यक्षांनी सभागृह चालवावे, अशी मागणी आम्ही केली. ॲड. निरवडेकर यांनी ऑनलाईन सिस्टीम बंद करण्याचे आदेश दिले, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानले. इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांना पाच वर्षांची भाडी भरावी लागणार आहेत. प्रशासक काळात संबंधित गाळेधारकांकडून भाडे वसुली केल्याने ही समस्या उद्भवली आहे. मी आठवण केल्यावर स्मरण पत्र प्रशासनान संबंधित गळेधारकांना पाठवले; मात्र ४ वर्षे प्रशासन झोपून होत का? त्यामुळे या गाळे मालकांना हे पैसे भरण्यासाठी मुदत द्यावी अथवा टप्प्याटप्प्याने हे पैसे भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.’’
दरम्यान, ५७ कोटींच्या नळपाणी योजनेवर काम करण्यास तज्ज्ञ अधिकारी नाही. बांधकाम विभाग यावर काम पाहत असून ५७ कोटी पाण्यात जाण्याची भीती आहे. पूर्ण प्रवाहाने पाणी पुरवठा न झाल्यास जबाबदार कोण? त्यामुळे या कामासाठी तज्ज्ञ नेमावा तसेच इंजिनिअर नेमावा, अशी मागणी आम्ही केली आहे. झालेल्या कामावर आमचा विश्वास नाही. यात कोणी घोटाळे केले ते पुराव्यानिशी योग्यवेळी सांगेन. कुठे कुठे बैठका झाल्या, बांधकाम विभागात काय केले, ते दाखवून देईन. लोक धूळ खात असताना प्रशासनाला काळजी नसल्याचा आरोप श्री. परब यांनी केला. यावेळी नगरसेवक अजय गोंदावळे, ॲड. नीता सावंत-कविटकर, ॲड. सायली दुभाषी, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.