कोकण

बँक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणास प्रतिसाद

CD

26931

बँक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणास प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरीत ‘को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज’चे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ : को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून पदाधिकारी व सदस्यांना बँकेचा व्यवसाय वाढविण्याबरोबरच, कर्मचाऱ्यांची संघटनेप्रती बांधिलकी, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी येथे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली ‘को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन’ ही संघटना कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून कमिटी सदस्यांना आणि बँकेतील युनियनच्या सभासदांना व्यावसायिक वृद्धी, कामातील तत्परता आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याबाबत या शिबिरात दिशा दर्शविण्यात आली.
युनियनचे कार्याध्यक्ष विष्णू तांडेल, उपाध्यक्ष प्रमोद पार्टे व समीर तुळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ फेब्रुवारीला बँकेच्या कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यालयात हे शिबिर झाले. यात जिल्हा बँकेतील युनियनचे पदाधिकारी तसेच देवगड नागरी सहकारी बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मुंबई येथील राज्य बँक कर्मचारी संघटनेचे माजी संघटक सचिव धर्मराज मुंढे, प्रमोद पार्टे आणि म्युनिसिपल बँकेचे माजी पदाधिकारी गुणाजी गोसावी यांनी शिबिरार्थींना सखोल मार्गदर्शन केले.
दिवसभर चाललेल्या या शिबिराचा समारोप करताना कार्याध्यक्ष विष्णू तांडेल यांनी पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले. बँकेप्रती प्रामाणिकपणा, सचोटी आणि निष्ठा राखून काम करा. आपली जबाबदारी सांभाळून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा बँक संघटनेचे सरचिटणीस दिगंबर गवाणकर यांनी शिबिरार्थी व मार्गदर्शकांचे आभार मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी युनिटचे संघटक सचिव विश्वनाथ डोर्लेकर, खजिनदार नीलेश कन्याळकर आणि कर्मचारी संचालक देवेन धुरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT