कोकण

जिल्ह्याच्या पालक सचिवपदी आप्पासाहेब धुळाज

CD

जिल्ह्याच्या पालक सचिवपदी धुळाज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : राज्य शासनाने प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी आता ‘इतर मागास व बहुजन कल्याण’ विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ही जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव तथा विशेष चौकशी अधिकारी सीमा व्यास यांच्याकडे होती. आता त्यांच्या जागी अनुभवी सनदी अधिकारी आप्पासाहेब धुळाज यांची वर्णी लागली आहे.
आप्पासाहेब धुळाज हे २००९च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत राज्यशासनाच्या विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. जून २०२५ पासून ते मंत्रालयातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. महसूल विभागातील अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार हाताळणे त्यांना सुलभ जाणार आहे. पालक सचिव म्हणून नियुक्ती झाल्यामुळे जिल्ह्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना, विकासकामांचा आढावा आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्याचे काम आता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडेल. राज्यातील मागासवर्गीय समाजाच्या योजनांच्या अंमलबजावणीत त्यांचा मोठा अनुभव असून, आता रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

Vidarbha Heatwave : विदर्भात उन्हाची लाट कायम; अकोला-अमरावती राज्यात ‘हॉट’, पुढचे चार दिवस 'येलो अलर्ट'

MPSC Success Story भावंडांची स्पर्धा परीक्षेत भरारी! पल्लवीची धर्मादाय विभागात, तर पंकजची महसूल सहाय्यक पदाला गवसणी, सातत्य अन् कठोर मेहनतीचे फळ..

यंदाचा मे महिना 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर ! ट्रिपल राजयोगाचा फायदा, पैशांची बरसात आणि करिअरमध्येही होणार प्रोमोशन

Land Measurement: शेतकऱ्यांना दिलासा! जमीन मोजणीमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती, प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार, ५२ रोव्हर यंत्रांमुळे कामाला गती..

SCROLL FOR NEXT