कोकण

कॅथॉलिक अर्बन बॅंकेला ''दीपस्तंभ'' पुरस्कार

CD

swt2425.jpg
26984
पुणे ः कॅथॉलिक अर्बन बॅंकेला पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.

कॅथॉलिक अर्बन बॅंकेला ‘दीपस्तंभ’ पुरस्कार
पुण्यात सन्मान ः पतसंस्था चळवळीतील दिशादर्शक कार्याची दखल
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित राज्यस्तरीय ‘दीपस्तंभ २०२५’ या पुरस्काराचा मान कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेला मिळाला आहे. संपूर्ण कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा मान मिळवणारी ही एकमेव संस्था आहे. महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीमध्ये दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आर्यन रिव्हरवुड रिसॉर्ट, जांभळी, वेल्हे रोड, भोर, पुणे येथे आज झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या राज्यव्यापी कार्यक्रमात सतीश मराठे (संचालक, भारतीय रिझर्व्ह बँक) व उदय जोशी (राष्ट्रीय अध्यक्ष, सहकार भारती, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन), ओमप्रकाश दादाप्या तथा काका कोयटे व इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला संस्थेच्या अध्यक्षा आनमारी डिसोजा, संचालिका मार्सेलिन डिसोजा, संचालक जॉनी फेराव, सरव्यवस्थापक जेम्स बॉर्जिस उपस्थित होते.
संस्थेने आजपर्यंत व्यवसायाची कटिबध्दता राखत सहकारातील कार्याची अखंडता कायम राखली आहे. संस्थेच्या पारदर्शक कारभारामुळे जिल्हावासीयांच्या मनात एक विश्वासाचे नाते तयार झाले आहे. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत संस्थेच्या सभासद ग्राहक संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे, असे अध्यक्ष आनमारी डिसोजा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT