कोकण

डेरवण युथ गेम्सला २७ पासून प्रारंभ

CD

‘डेरवण युथ गेम्स’ला उद्यापासून प्रारंभ
‘स्केटिंग’चाही समावेश ; सात हजार खेळाडूंचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडासंकुलात ‘डेरवण युथ गेम्स’ला शुक्रवारी (ता.२७)पासून सुरुवात होणार आहे. शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या १२ व्या डेरवण युथ गेम्सचे उद्‍घाटन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक चंद्रजित जाधव यांच्या हस्ते होईल.
विविध क्रीडास्पर्धा २७ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२६ या कालावधीत पार पडतील. या स्पर्धेमध्ये अ‍ॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम तसेच देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी, खो-खो, लंगडी, मल्लखांब, योगा या वैयक्तिक खेळांसह फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या खेळांचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ‘वॉल क्लाइंबिंग या साहसी खेळाबरोबरच, यावर्षी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ‘स्केटिंग’ खेळाचाही समावेश करण्यात आला आहे.
भारतीय खेळ आणि ऑलिम्पिक खेळांचा संगम असणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील सात हजारांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. यंदाही विजेत्यांना पदके, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. १,२०० पदके आणि ११५ करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत. अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले आहे. विविध क्रीडा प्रकारांत राज्यातील खेळाडूंचा चित्तथरारक खेळ या स्पर्धेनिमित्त पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. या स्पर्धेत ८ वर्षांखालील ते १८ वर्षांखालील खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCच्या ३१ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, विकासकामांसाठी वापरणार; भाजपचा महापौर होताच मोठा निर्णय

Rinku Singh: रिंकू सिंगची वर्ल्ड कप स्पर्धेच्या उर्वरित सामन्यातून माघार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

Investment Scheme: सुरक्षित गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय! पोस्ट ऑफिसची ग्राम प्रिया योजना; दरमहा थोडी गुंतवणूक करा आणि मिळवा लाखांचा फंड

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा वायू गळती

Horscope : उद्या 26 फेब्रुवारी! 'या' 5 राशींसाठी गुडन्यूज; घरी येणार पैसा, आरोग्याची मोठी तक्रार होईल दूर, करिअरला नवी दिशा मिळणार

SCROLL FOR NEXT