- rat२५p४.JPG-
२६O२७०६६
रत्नागिरी- राज्य नाट्य स्पर्धेत श्रीकला संस्कार न्यास, डोंबिवली या संस्थेने केलेल्या ‘दगडी भिंत’ या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
हेलन केलर यांच्या अदम्य
जिद्दीची गाथा : ‘दगडी भिंत’
अज्ञान, अपंगत्व आणि नैराश्य यांची भिंत भेदणाऱ्या अमेरिकेतील अंध आणि मूक-बधिर कन्या हेलन केलर यांच्या जीवनावर आधारित ‘दगडी भिंत’ ही नाट्यसंहिता लेखिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी लिहिली आहे. दिग्दर्शक आशुतोष वाघमारे यांच्या संकल्पनेतून हे नाटक ‘श्रीकला संस्कार न्यास, डोंबिवली’ या संस्थेने सादर केले. हेलन केलर यांच्या आयुष्यातील हा संघर्षमय प्रवास कलाकारांच्या कसदार अभिनयातून आणि नेपथ्यातून प्रभावीपणे उलगडला आहे.
- नरेश पांचाळ, रत्नागिरी
-------
‘दगडी भिंत’ हे नाटक जगप्रसिद्ध अंध आणि मूक-बधिर विदुषी हेलन केलर यांच्या जीवनावर आधारित आहे. हेलन लहानपणी मेंदूज्वरामुळे अंध आणि बहिरी झाली होती. तिच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी तिची शिक्षिका अॅनी सुलिव्हन तिच्या घरी येते. हेलन सुरुवातीला अत्यंत हट्टी आणि अनियंत्रित असते. अॅनी अत्यंत संयम, प्रेम आणि कठोर शिस्त यांच्या साहाय्याने हेलनला शब्द, स्पर्श आणि संकेत यांच्या माध्यमातून संवाद साधायला शिकवते. ‘पाणी’ या शब्दाच्या अनुभवातून हेलनला भाषेचा अर्थ उमगतो आणि तिच्या आयुष्यात ज्ञानाचे नवे दालन उघडते.
नाटकात ‘प्रिन्स’ नावाचा पत्रकार हेलनची मुलाखत घेण्यासाठी येतो, त्यातून हेलनचे भावविश्व, तिचा संघर्ष आणि अॅनीचा त्याग अधोरेखित होतो. अॅनीच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया होणार असताना तिच्या जाण्याची शक्यता निर्माण होते, पण ती हेलनला स्वावलंबी बनवूनच पुढे जाण्याचा निर्णय घेते. शेवटी हेलन स्वतःची आत्मकथा लिहिण्याचा निर्धार करते. अशा प्रकारे अंधारातून प्रकाशाकडे झालेला तिचा प्रवास या नाटकातून प्रभावीपणे उभा राहतो. शारीरिक मर्यादा असल्या तरी प्रबळ इच्छाशक्तीने माणूस यश मिळवू शकतो, तसेच योग्य मार्गदर्शन आयुष्य बदलू शकते, हा संदेश हे नाटक देते. हेलन स्वतःच्या पायावर उभी राहते आणि एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनते. अंधार कितीही दाट असला तरी ज्ञानाचा प्रकाश त्यावर मात करू शकतो, हेच या नाटकाचे सार आहे.
-----
सूत्रधार आणि साहाय
प्रकाश योजना – विनोद राठोड, पार्श्वसंगीत- आशुतोष वाघमारे, संगीत संयोजन- ओमकार जाधव, नेपथ्य – वृश्यांक कवठेकर, वेशभूषा- मानसी साळवी, रंगभूषा- उल्लेश खंदारे व भारत सोनवणे, नृत्य- अवनी पटवर्धन. रंगमंच व्यवस्था – मंजिरी साने, खुशाल भगत, अभिराम कुलकर्मी, रिद्धेश सावंत, स्वरांगी जोशी, वैष्णवी देव, चैताली ब्रह्मे, श्रुती चवाण, नुतन चौधरी, योगेश विरकर, मीनल लेले, माधवी जोशी, ज्योती दाते, किमया नेरुरकर, स्वानंदी जोशी, प्रतिक्षा धनके.
-----
पात्र परिचय
एना- निखिला इनामदार, मेसी व मिस्टर केलर- प्रशांत जोशी, पॉली व तरुण मिस एना- वंशिका इनामदार, हेलन केलर- श्रुती गणपुले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.