कोकण

सोंडे ग्रामपंचायतीला ५० लाखाचा पुरस्कार

CD

देवघर-सोंडे ग्रामपंचायत राज्यात तिसरी
माझी वसुंधरा अभियान ; ५० लाखांचा पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ : तालुक्यातील देवघर-सोंडे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सरपंच सुनील मोरे, उपसरपंच रवींद्र इंगळे, ग्रामपंचायत अधिकारी दीपक कदम यांनी ५० लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह स्विकारले.
वरळी-मुंबई येथील डोम सरदार वल्लभभाई पटेल क्रीडांगणात झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान राज्यातील पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत चालवलेले एक प्रमुख अभियान आहे. त्यानुसार देवघर-सोंडे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत सरस कामगिरी करताना पर्यावरणाचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न केले. अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय करपे, विस्तार अधिकारी नाथा पाटील, कृषी विस्तार अधिकारी दिनेश राणे, गावडे, लोहार ..यांचे सहकार्य लाभले. सरपंच सुनील मोरे, उपसरपंच रवींद्र इंगळे, ग्रामपंचायत अधिकारी दीपक कदम, माजी सरपंच नामदेव सोंडकर, माजी उपसभापती रवींद्र मोरे, सदस्या दिपाली मोरे, कांचन मोरे, पुष्पा मोरे, कर्मचारी किरण मोरे, गणेश मोरे, प्रशांत सोंडकर, जगदीश सोंडकर यांनी या अभियानात विशेष योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT