कोकण

‘धुके वाढल्यामुळे सावधगिरी बाळगा’

CD

‘धुके वाढल्यामुळे
सावधगिरी बाळगा’

सिंधुदुर्गनगरी, ता. २५ : जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्यानंतर अनेक ठिकाणी दाट धुके पसरलेले आढळून आले. या पार्श्वभूमीवर धुक्याच्या परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत प्रसारित केल्या आहेत.
पत्रकात नमूद केले आहे की, धुके म्हणजे हवेमध्ये पाणी व बर्फाचे अत्यंत सूक्ष्म कण तरंगत असल्यामुळे दृष्यमानता कमी होणे होय. धुक्याच्या परिस्थितीत सार्वजनिक सुरक्षितता आणि रस्ता अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी. प्रवासादरम्यान मुख्य रस्त्यावर वाहन उभे करू नये. वाहन थांबवावे लागल्यास फॉग लाईट किंवा पार्किंग लाईट सुरू ठेवावेत, जेणेकरून इतरांना वाहन स्पष्ट दिसेल. वाहन चालविणे कठीण झाल्यास रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे थांबून इंडिकेटर सुरू ठेवावा. डिफॉस्टर आणि विंडस्क्रीन वायपरचा वापर करावा. फॉग लाईट किंवा लो-बीम हेडलाईटचा वापर करणे आवश्यक आहे. पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवून नियंत्रित वेगात वाहन चालवावे. पहाटे आणि उशिरा रात्री प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाकडून प्रसारित करण्यात येणाऱ्या कृषी सल्ल्यानुसार पिके व फळबागांची काळजी घ्यावी. हवामानाची अद्ययावत माहिती भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही यात नमूद आहे.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT