कोकण

काजूचा मोहोर करपला; आशा हरपल्या

CD

27146

काजूचा मोहोर करपला; आशा हरपल्या

उत्पादकांची भरपाईसाठी हाक; वैभववाडीत हेक्टरी अडीच लाखांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २५ ः अतिथंडी, ढगाळ वातावरण आणि प्रचंड धुके यामुळे तालुक्यातील काजू पिकाला आलेला मोहोर करपला आहे. १५ ते २० टक्केदेखील काजू उत्पादन येण्याची शाश्वती नाही. त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक संकटात सापडलेल्या काजू उत्पादकांना हेक्टरी अडीच लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील काजू बागायतदारांनी केली आहे.
तालुक्यातील काजू बागायतदारांनी काल (ता.२४) येथील तहसीलदार सूर्यकांत पाटील यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व काजू उत्पादक नासीर काझी, राजू पवार, दिगंबर पाटील, महेश रावराणे, नरेंद्र कोलते, उज्ज्वल नारकर, विनोद आयरे, प्रकाश सावंत, सूर्यकांत बोडके आदी उपस्थित होते.
यावर्षी काजू पिकाला मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. मात्र, दीड-दोन महिने स्थिरावलेली थंडी, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्माण झालेले ढगाळ वातावरण आणि सततचे धुके यामुळे काजू पिकाला आलेला मोहोर करपला आहे. आलेल्या मोहोरापैकी केवळ १५ ते २० टक्केच फळधारणा झाली आहे. त्यामुळे काजू उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. किटकनाशक, बुरशीनाशक आणि खतांच्या वाढलेल्या किमती आणि वाढलेला मजूर खर्च यामुळे काजू उत्पादक अडचणीत येणार आहे. तालुक्यातील अधिकतर शेतकरी हा काजू उत्पादनावर अवलंबून आहे. उत्पादनच आले नाही, तर शेतकरी कर्जबाजारी होणार आहे. त्यामुळे शासनाने या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.
---
तातडीने पंचनामे करणे आवश्‍यक!
तालुक्यातील काजू पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि हेक्टरी अडीच लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. काजू उत्पादकांनी तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख यांचीही भेट घेतली. काजू नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत, तसेच नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

कधीकधी भीती वाटते... 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीने घेतलाय लग्नाचा निर्णय; कारण सांगत म्हणाली- आई-बाबा बीडला...

Mumbai Police Arrest 25 Bangladeshis : मुंबई पोलिसांनी सापळा रचून २५ बांगलादेशींना केली अटक ; बनावट कागदपत्रेही जप्त

Viral Video : हेलिपॅड, 100 एकरची जागा आणि भव्य फार्महाऊस ; कोई मिल गया फेम खलनायकाची प्रॉपर्टी पाहून येईल चक्कर !

SCROLL FOR NEXT