कोकण

वरेरकर नाट्यगृह परिसरातील दुर्लक्षित विहिरीला स्वच्छतेचा मोकळा श्वास

CD

27156

वरेरकर नाट्यगृह परिसरातील दुर्लक्षित
विहिरीला स्वच्छतेचा मोकळा श्वास
मालवण : शहरातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या मामा वरेरकर नाट्यगृह परिसरातील दुर्लक्षित विहिरीला अखेर स्वच्छतेचा मोकळा श्वास मिळाला आहे. उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वखर्चाने या विहिरीतील कचरा आणि गाळ साफ करून घेत एक सामाजिक आदर्श घालून दिला आहे. सोमवारी (ता. २४) नाट्यगृह परिसराची पाहणी करत असताना उपनगराध्यक्ष पाटकर यांना येथील विहिरीची अत्यंत दुरवस्था झाल्याचे दिसून आले. विहिरीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, घरगुती कचरा व साचलेला गाळ यामुळे विहिरीचे अस्तित्व धोक्यात आल्याचे निदर्शनास आले. पाटकर यांनी आज सकाळी तातडीने स्वच्छतेचे काम हाती घेतले. अनेक वर्षांपासून साचलेला गाळ आणि प्लास्टिक कचरा विहिरीतून बाहेर काढण्यात आला. भविष्यात पुन्हा कोणीही विहिरीत कचरा टाकू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विहिरीवर ‘ग्रीन मॅट’ बसवली आहे. या संपूर्ण मोहिमेचा खर्च पाटकर यांनी स्वतः उचलला आहे. या मोहिमेवेळी पाटकर यांच्यासोबत सुभाष कुमठेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. विहिरीचा कायापालट झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पाटकर यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

कधीकधी भीती वाटते... 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीने घेतलाय लग्नाचा निर्णय; कारण सांगत म्हणाली- आई-बाबा बीडला...

Mumbai Police Arrest 25 Bangladeshis : मुंबई पोलिसांनी सापळा रचून २५ बांगलादेशींना केली अटक ; बनावट कागदपत्रेही जप्त

SCROLL FOR NEXT