कोकण

-देवरुखात शनिवारी साहित्यिकांचे साहित्य संमेलन

CD

साहित्यिकांचे देवरुखात उद्या संमेलन
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता, २६ ः देवरूख येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयात संगमेश्वर तालुक्यातील साहित्यिकांचे एकदिवसीय संमेलन शनिवारी (ता. २८) होणार आहे. रत्नागिरी जिल्हा ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वर्षा फाटक असणार आहेत. महाराष्ट्र ग्रंथालय चळवळीचे मार्गदर्शक श्रीकृष्ण साबणे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन होईल. साहित्यिका प्रा. जयश्री बर्वे, गोवा येथील साहित्यिक आणि व्याख्याते कृष्णाजी कुलकर्णी, तसेच ज्येष्ठ समीक्षक सुरेश जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
दीपक लिंगायत- एकांकिका, स्वानंदी जोगळेकर- ललित लेख, अमित पंडित- विज्ञान कथा, डॉ. निधी पटवर्धन- विनोदी कथा, मंजुश्री भागवत- प्रवासवर्णन, अनघा लिमये- पुस्तक परीक्षण, प्रा. सीमा शेट्ये- वैचारिक निबंध, स्वानंद जोशी- कथा आणि आनंद बोंद्रे- संगमेश्वरी बोलीवरील साहित्य वाचन करणार आहेत. भारती राजवाडे, विनय होडे आणि मदन मोडक हे काव्यवाचन करणार आहेत. संमेलनात लेखक आणि शिक्षक अमित पंडित यांच्या व्हाईट बोर्ड पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. साहित्य संमेलनाला साहित्यप्रेमी, शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष ग. के. जोशी आणि संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ. अ. म. कुलकर्णी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Provident Fund: PF धारकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! 31 लाख खातेधारकांना काही न करता मिळणार 11,000 कोटी; जाणून घ्या कधी?

Marriage Fraud: विवाहापूर्वी सांगितला ५० हजार पगार; प्रत्यक्षात जावयाला ७००० रुपयेच, साेलापूरात जुळ्या बहीणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : शिंदखेडा-विरदेल मार्गावर कापसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला

Fraud Case : ए. एस. ट्रेडर्स व उपकंपनीच्‍या; पलूसमधील संचालकाला अटक मुख्य संशयित सुभेदारने केली होती नेमणूक

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी केलेल्या महिलांना चालू महिन्याचेच पैसे; नोव्हेंबर, डिसेंबरच्या हप्त्यापासून लाडक्या बहिणी वंचित

SCROLL FOR NEXT