खेरवसेतील महसूल अधिकाऱ्याच्या घरी चोरी
लांजा ः तालुक्यातील खेरवसे येथून आठ हजार रुपयांचा पाण्याचा पंप व अन्य साहित्य असे ८ हजार ७०० रुपयांचे साहित्य चोरट्याने चोरून नेले. याची फिर्याद कुलदीप नामदेव गायकवाड (वय ४०, रा. माऊली नगर, लांजा) यांनी लांजा पोलिस ठाण्यात दिली. कुलदीप गायकवाड हे लांजा येथील महसूल खात्यात नोकरीला आहेत. ते नांदेड येथील मूळ गावी गेले होते. त्याचा फायदा उठवत चोरट्याने त्यांच्या घरी चोरी केली. कुलदीप गायकवाड यांची खेरवसे येथे जमीन असून तेथील विहिरीवर पेट्रोलवर चालणारा पाण्याचा पंप (आठ हजार रुपये), तसेच चारशे रुपयांचे फवारणीचे औषध, दोन लिटर पेट्रोल आणि एक लिटर ऑईल असा एकूण आठ ८ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रेवणे करत आहेत.
निवसरमधून दुचाकीची चोरी
लांजा ः तालुक्यातील निवसर-बौद्धवाडी येथे उभी करून ठेवलेली दुचाकी चोरट्याने पळवल्याची घटना १८ ते १९ फेब्रुवारी दरम्यान घडली. याची तक्रार विकास सखाराम कांबळे (वय ४०,रा. निवसर बौद्धवाडी) यांनी लांजा पोलिस ठाण्यात केली आहे. विकास कांबळे यांनी त्यांची दुचाकी कामावरून घरी आल्यानंतर रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान वाडीतील नालंदा बौद्ध विहाराजवळ उभी केली होती. तेथून चोरट्याने ही गाडी चोरून नेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.