कोकण

पुस्तक परीक्षणात नारिंगणेकर प्रथम

CD

swt261.jpg
27298
आजगाव ः वाचन साधना उपक्रमाच्या मार्गदर्शनप्रसंगी उपस्थित वाचक.

पुस्तक परीक्षणात नारिंगणेकर प्रथम
‘वाचन साधना’ला प्रतिसाद ः आजगाव साहित्य प्रेरणा कट्ट्याचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्यातर्फे जानेवारीपासून साहित्यिक कुमुद रेगे वाचन साधना उपक्रम राबवला जात आहे. सहभागी तेरा वाचक दरमहा एक पुस्तक वाचून त्यावर परीक्षण लिहीत आहेत. जानेवारीतील ‘कथासंग्रह’ या साहित्य प्रकारात शिरोड्यातील स्नेहा नारींगणेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर प्रा. नीलम कांबळे यांना द्वितीय व अरुण धर्णे आणि शेखर पणशीकर यांना तृतीय क्रमांक मिळाला. स्नेहा नारींगणेकर यांनी वि. स. खांडेकर यांच्या ‘क्षितिज स्पर्श’ या कथासंग्रहाचे परीक्षण केले आहे.
या उपक्रमांतर्गत प्रियदर्शनी म्हाडगुत यांनी शंकर पाटील यांचा ‘वळीव’, सरोज रेडकर यांनी मोहन काळे यांचा ‘पळस फुलला’, अरुण धर्णे यांनी मधू मंगेश कर्णिक यांचा ‘तहान’, नीलम कांबळे यांनी कृष्णा पाटील यांचा ‘नियतीचे खटले’, राजेश वैज यांनी जयंत साळगावकर यांचा ‘वांग्याचे भरीत’, जयदीप देशपांडे यांनी विजय ना. कापडी यांचा ‘मान ना मान, मै तेरा मेहमान’, सोमा गावडे यांनी व. पु. काळे यांचा ‘चतुर्भुज’, वैभवी रायशिरोडकर यांनी हरिश्चंद्र पाटील यांचा ‘संस्कार फुले’, शेखर पणशीकर यांनी सोनाली परब यांचा ‘ओळख’, सायली लोणे यांनी कुंदा कवळेकर यांचा ‘ही वाट दूर जाते’, अर्चना लोखंडे यांनी रणजित देसाई यांचा ‘मेघ’ आणि विनय सौदागर यांनी व्यंकटेश माडगूळकर यांचा ‘हस्ताचा पाऊस’ अशा तेरा कथासंग्रहाचे परीक्षण करण्यात आले.
कुडाळ येथील चोखंदळ वाचक प्रसाद रेगे यांनी पुरस्कृत केलेल्या या उपक्रमासाठी मांद्रे-गोवा येथील साहित्यिक प्रा. गजानन मांद्रेकर यांनी परीक्षक म्हणून, विनय सौदागर यांनी संयोजकाचे काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घातपात, हलगर्जीपणा की गुन्हेगारी कृत्य... अजित पवारांच्या मृत्यूमागे नेमकं काय? पत्रकार परिषदेत सीआयडीनं कोणते संकेत दिले? वाचा...

हृदयस्पर्शी Video: फुटबॉल लागून 'SEAGULL' पक्षी कोसळला, खेळाडू त्वरित मदतीला धावला... CPR देऊन वाचवले प्राण...

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Explained : दक्षिण आफ्रिककडून वेस्ट इंडिजचा पराभव व्हावा, ही तर भारताची इच्छा! पण, का?

India Semi-Final Scenario: बापरे! भारताला तब्बल २९० धावांनी झिम्बाब्वेला हरवावं लागेल? नेमकं कसं आहे गणित, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT