कोकण

-लांजा सभापतिपदाची उत्सुकता

CD

लांज्यात सभापतिपदाची उत्सुकता
आसगे गणाला प्राधान्याची शक्यता: उपसभापतिपदही शिवसेनेकडेच
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २६ ः तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीनंतर आता सभापतिपदाचे वेध लागले आहेत. पंचायत समितीवर शिवसेना युतीचे एकतर्फी वर्चस्व असल्याने सभापतिपदी माजी सभापती राहिलेल्या आणि आसगे पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या मानसी आंबेकर यांची निवड होण्याची शक्यता आहे.
पंचायत समितीवर प्रथमच निवडून आलेल्या नवीन सदस्याच्या गळ्यात उपसभापतिपदाची माळ पडेल, अशी शक्यता आहे.
शिवसेनेने निवडणुकीत एकतर्फी बाजी मारताना चार जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समिती गणांवर विजय संपादन केला. निवडून आलेल्या आठ पंचायत समिती सदस्यांपैकी चार सदस्य हे पूर्णपणे नवीन असून, चार सदस्यांनी यापूर्वी पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. यामध्ये आदेश आंबोळकर, मानसी आंबेकर, दीपाली दळवी यांनी पंचायत समिती सभापती-उपसभापतिपद भूषवले आहे. यशवंत वाकडे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. शैलेश खामकर, उमेश पत्की, साक्षी चव्हाण आणि रसिका मेस्त्री हे चौघे प्रथमच सदस्य म्हणून निवडून आले आहेत. यापैकी शैलेश खामकर हे युतीमधून भाजपचे पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
निवडून आलेल्या सदस्यांमध्ये मानसी आंबेकर यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.‌ नव्याने निवडून आलेल्यांपैकी एकाची उपसभापतिपदी वर्णी लागेल, अशी शक्यता आहे. उपसभापतिपदही शिवसेनेच्याच सदस्याला दिले जाणार, हे निश्चित आहे.‌ त्यासाठी रसिका मेस्त्री किंवा साक्षी चव्हाण यांच्यात चुरस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

होर्मुझनंतर मलक्का सामुद्रधुनीकडे वळले ट्रम्प, भारतापासून १५० किमी अंतरावर; अमेरिकेनं केला मोठा करार, चीनची कोंडी

Investment: SIP की PPF? 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीत 15 वर्षांत कुठे मिळणार जास्त पैसा; जाणून घ्या सोप्या शब्दांत

'मला डिव्होर्सी मुलगाच हवा होता' लग्नासाठी अपूर्वा नेमळेकरचं होतं स्पष्ट मत, म्हणाली...'ज्याला त्या दुखाची जाणीवच...'

काय? आपल्या मुंबईत 'झोंबी' आलाय? रस्त्यावर तासनतास पुतळ्यासारखा वाकून उभा राहिला तरुण; लोक सुद्धा घाबरले! Viral Video

Latest Marathi News Live Update: पुण्यात पीएमपी बस ब्रेकडाउन वाढले; मार्चमध्ये १८००हून अधिक बस बंद, प्रवासी त्रस्त

SCROLL FOR NEXT