कोकण

रिंगणे येथे महिला मेळावा उत्साहात

CD

- rat२६p२.jpg-
२६O२७३१३
लांजा ः रिंगणे येथे आयोजित महिला मेळाव्यात सहभागी महिला.
----
रिंगणे येथे महिला मेळावा उत्साहात
कोकण संस्था, ग्रामपंचायतीचा पुढाकार ; तज्ज्ञांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २६ ः महिलांची आर्थिक उन्नती आणि सामाजिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने लांजा तालुक्यातील रिंगणे येथे ‘कोकण कला व शिक्षणविकास संस्था’ आणि ‘ग्रामपंचायत रिंगणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला मेळावा संपन्न झाला. १५व्या वित्त आयोगांतर्गत आयोजित या कार्यक्रमात गावातील महिला आणि किशोरवयीन मुलींनी ७० ते ८० च्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या मेळाव्यात कृषी विज्ञान केंद्र,लांजा येथील तज्ज्ञांनी महिलांना स्वयंरोजगाराच्या विविध संधींची माहिती दिली. डॉ. महेश महाले यांनी कुटुंबाचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेतीचे महत्त्व आणि त्यातून उत्पन्न वाढवण्याचे उपाय सांगितले तसेच डॉ. वैभव येवले यांनी मत्स्य व्यवसायातील आधुनिक संधींविषयी मार्गदर्शन केले तर वरिष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. आनंद हणमंते यांनी दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालनातून आर्थिक स्थैर्य कसे मिळवता येईल, यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला उपस्थित लांजाचे गटविकास अधिकारी गिरी यांनी कुटुंबाच्या सुदृढ आरोग्यासाठी विषमुक्त शेती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सरपंच संजय आयरे यांनी महिलांना आश्वासन दिले की, महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेल. या प्रसंगी ग्रामसेवक भागवत, समुदाय आरोग्य अधिकारी दीपाली परचंडेकर, आरोग्य सहाय्यक जंगम, ग्रामपंचायत सदस्य आर्या आयरे, श्रावणी धुळप, कोकण एनजीओचे समन्वयक गौरव पाटकर, समीर शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. गौरव पाटकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर समीर शिर्के यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गोपालदासपूर येथील 500 वर्ष जुन्या राखल राजा मंदिरात पोयला बैशाखची प्रार्थना करण्यासाठी भाविक दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT