swt2620.jpg
27345
आंबोली ः सांबराच्या पिल्लाला बाहेर काढताना रेस्क्यू टीम.
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी
सांबराला आंबोलीत जीवदान
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. २६ ः येथे कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी सांबराच्या पिल्लाला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने वाचवले. फौजदारवाडी गणेश कोंड या ठिकाणी आज भटक्या कुत्र्यांनी एका सांबर हरणाच्या पिल्लाला जखमी केले.
याबाबत माहिती मिळताच आंबोली वनक्षेत्रपाल यांच्या रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्या ठिकाणी टीमचे सदस्य प्रथमेश गावडे, दीपक नाटलेकर यांनी पाण्यात उतरून सांबराच्या पिल्लाला बाहेर काढले. आंबोली वन कार्यालयामध्ये आणून वैद्यकीय उपचार करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. यावेळी आंबोली वनरक्षक अनिकेत आवारे, वनसेवक मंगेश सावंत, एकनाथ पारधी, वसंत गावडे, जलद कृती दलाचे सदस्य प्रथमेश गावडे, दीपक नाटलेकर, श्रीकृष्ण गवस, आत्माराम मोहिते, नीलेश गावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.