कोकण

-रत्नागिरी- कल्पनेपासून पेटंटपर्यंतचे मार्गदर्शन

CD

संशोधनातून पेटंटकडे वाटचाल
‘फिनोलेक्स’मध्ये, विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
रत्नागिरी, ता. २७ : फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी येथील संशोधन व विकास सेलतर्फे, फिनोलेक्स ॲकॅडमी, आयआयसी यांच्या सहकार्याने आणि एआयसी पिनॅकल इंटरप्रुनरशिप फोरम (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आयपी अवेअरनेस आणि पेटंट फाइलिंग वर्कशॉपचे (आयपी जागरूकता आणि पेटंट फाइलिंग कार्यशाळा) आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा हक्क याबाबत जागरूक करणे, पेटंट अर्ज प्रक्रिया समजावून सांगणे आणि नवकल्पनांना कायदेशीर संरक्षण कसे द्यावे याबाबत मार्गदर्शन करणे हा होता. यात ५२ विद्यार्थी व १० प्राध्यापकांनी सहभाग घेतला. नोंदणीकृत भारतीय पेटंट एजंट व क्नोट्टी आयपीचे संचालक आशुतोष प्रचंड यांनी पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट व डिझाईन या बौद्धिक संपदेच्या प्रकारांबाबत सविस्तर माहिती दिली. पेटंट अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, कालमर्यादा तसेच अर्ज करताना टाळावयाच्या चुका यावर त्यांनी मार्गदर्शन केले. एआयसी पिनॅकल येथील आयपी असोसिएट अ‍ॅड. सुचित्रा जाधव यांनी पेटंट फाइलिंगसाठी उपलब्ध शासकीय योजना, आर्थिक सहाय्य व परतावा प्रक्रियेची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : खंडणीसाठी कानपूरच्या व्यावसायिकाचे अपहरण; पाच आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT