कोकण

नवी मुंबईत निवेली ग्रामपंचायतीचा गौरव

CD

-rat२६p१८.jpg-
P२६O२७३७७
राजापूर ः कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना निवेलीच्या सरपंच स्नेहा कुवेसकर, उपसरपंच एकनाथ आगरे, प्रणय टुकरूल, अमोल करंगुटकर आदी.
------
नवी मुंबईत निवेली ग्रामपंचायतीचा गौरव
महाआवासमध्ये लक्षवेधी काम ; कोकण विभागात द्वितीय क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ ः तालुक्यातील निवेली ग्रामपंचायतीने शासनाच्या प्रधानमंत्री महाआवास अभियानामध्ये लक्षवेधी कामगिरी करीत राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा कोकण विभागस्तरीय दुसरा क्रमांक (२०२३-२०२४) पटकाविला. ९० दिवसांच्या निर्धारित कालावधीमध्ये निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करीत बेघरांना घर, कच्चे घर असलेल्या पक्के घर निवेली ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिले आहे. शासनाच्या विविध योजनांमध्ये यशस्वी लक्षवेधी कामगिरी यापूर्वी विविध पुरस्कारांवर निवेली ग्रामपंचायतीने यशाची मोहोर उमटवली.
नवी मुंबई येथे कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते निवेलीच्या सरपंच स्नेहा कुवेसकर, उपसरपंच एकनाथ आगरे, ग्रामपंचायत अधिकारी सचिन हातणकर, ग्रामपंचायत कर्मचारी प्रणय टुकरूल, पंचायत समितीचे अमोल करंगुटकर आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.
बेघरांना हक्काचे घर आणि कच्चे स्वरूपातील घर असलेल्यांना हक्काचे पक्के घर देण्याच्या उद्देशाने शासनातर्फे महाआवास योजना ही महत्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. या योजनेची निवेली ग्रामपंचायतीने प्रभावी अंमलबजावणी केली. या योजनेची माहिती आणि महत्व नागरिकांपर्यंत पोहोचवून पटवून देण्यात आले. त्याला ग्रामस्थांसह लाभार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये निर्धारीत ९० दिवसांच्या कालावधीमध्ये २०२३-२०२४ मध्ये निर्धारित असलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करताना मोदी आवास योजनेची ९ पैकी ९ आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील ११ पैकी ११ घरांची उभारणी करण्यात ग्रामपंचायतीला यश आले.
---
कोट ः
केंद्र आणि राज्य शासनाच्या महाआवास योजनेची सविस्तर माहिती निवेली ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्थापर्यंत पोहोचविण्यात आली. निर्धारित ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी मोदी आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यात ग्रामपंचायतीला यश आले. या यशामध्ये ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, ग्रामस्थ, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आदींचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
--सचिन हातणकर, ग्रामपंचायत अधिकारी, निवेली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

SCROLL FOR NEXT