कोकण

पान एक-बागायतदारांच्या मोर्चाने वेंगुर्ले दणाणले

CD

27419

वेंगुर्ले : नुकसान भरपाईसाठी संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर केलेले धरणे आंदोलन.
27420
वेंगुर्ले ः बागायतदारांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांना निवेदन दिले.

बागायतदारांच्या मोर्चाने वेंगुर्ले दणाणले
सहा मार्चपर्यंत भरपाई द्या; अन्यथा महामार्गावर चक्काजाम

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २६ ः आंबा, काजू बागायतदारांना तातडीने नुकसान भरपाई जाहीर करण्याच्या मागणीसाठी आज येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. यावेळी बागायतदारांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला. येत्या सहा मार्चपर्यंत न्याय न मिळाल्यास आंदोलन उग्र करू. प्रसंगी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
''आंबा काजू नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे'', ''आमची मागणी मान्य करा'', ''आंबा, काजू बागायतदार शेतकरी बांधवांच्या एकजुटीचा विजय असो'', ''कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही'' अशा जोरदार घोषणा देत वेंगुर्ले बसस्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना व तालुक्यातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. त्यानंतर तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करत तहसीलदार ओंकार ओतारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासनाने सहा मार्चपर्यंत योग्य कार्यवाही न केल्यास १२ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, उपाध्यक्ष पांडुरंग गावडे, सचिव स्वप्नील शिरोडकर, अन्य पदाधिकारी, ज्येष्ठ नेते एम. के. गावडे, आंबा-काजू बागायतदार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर, जनार्दन पडवळ, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, प्रगतशील शेतकरी प्रकाश गडेकर, माजी सभापती यशवंत ऊर्फ बाळू परब, माजी सभापती प्रफुल्लचंद्र परब, माजी नगरसेवक नागेश गावडे, आडेली जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, नगरसेवक प्रीतम सावंत, संदेश निकम, प्रणव वायंगणकर, शीतल आंगचेकर, सुषमा प्रभूखानोलकर, भाजप युवा मोर्चाचे हितेश धुरी, भूषण आंगचेकर, आडेली सोसायटीचे माजी चेअरमन समीर कुडाळकर, तुळस माजी सरपंच विजय रेडकर, वजराट गिरेश्वर सोसायटीचे माजी चेअरमन बाबूराव परब, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, ठाकरे शिवसेना शहरप्रमुख शैलेश परुळेकर, माजी उपनगराध्यक्ष रमण वायंगणकर, काजू बागायतदार संतोष गाडगीळ आदींसह तालुक्यातील आंबा, काजू बागायतदार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनाव्दारे क्षेत्र मर्यादेचा निकष काढून टाकून प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई जाहीर करावी, हवामानातील बदलामुळे आंबा-काजू पिकाचे नुकसान झालेल्या बागायतदारांना भरपाई मिळावी, काजू पिकासाठी हेक्टरी नुकसान भरपाई तीन लाख रुपये जाहीर करावी, पंचनामे न करता सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत. तातडीने शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे नुकसानभरपाई जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कोट
आंब्याला हेक्टरी पाच लाख तर काजूला हेक्टरी तीन लाखांपर्यंत सरसकट नुकसान भरपाई द्यावी. भरपाई मिळत नाही, तोपर्यंत गप्पा बसणार नाही. त्यासाठी १२ मार्चला जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढून मुंबई-गोवा महामार्गावर चक्का जाम करू. शासनाने अंत पाहू नये. शासनाला आमची किंमत नसेल तर सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील सर्व शेतकरी एकत्र येऊन मंत्रालयावर मोर्चा काढू.
- संजय गावडे, अध्यक्ष, शेतकरी न्याय हक्क संघटना, वेंगुर्ले

कोट
गेली चार वर्षे सातत्याने शेतकरी नुकसानीत आहे. आंबा, काजू उत्पादकांकडे शासनाचे लक्ष नाही. कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाही, याचा अर्थ शेतकरी श्रीमंत आहे, असा नाही. आंबा व काजूवरच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित असते. आज शेतकरी मोठ्या संकटात आहेत. शासनाने लक्ष दिले नाही तर पुढील पाच वर्षे शेतकरी उभा राहू शकत नाही. यामुळे कागदी घोडे न नाचवता आमच्या मागण्या मान्य कराव्यात. गेल्या चार वर्षांत तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे. या मोर्चाची दखल घेऊन या अधिवेशनात नुकसान भरपाईचा निर्णय जाहीर करावा आणि तो तत्काळ लागू करावा.
- एम. के. गावडे, ज्येष्ठ नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

SCROLL FOR NEXT