कोकण

उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार तांबे यांना जाहीर

CD

उत्कृष्ट मराठी अध्यापक
पुरस्कार तांबे यांना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाच्यावतीने जिल्ह्यातील मराठी अध्यापकांना देण्यात येणारे उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार जाहीर केले आहेत. यंदाचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार केळुस येथील स. का. पाटील विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक शैलेश तांबे यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्कारांचे वितरण पुस्तक दिनाचे औचित्य २३ एप्रिलला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट येथे मराठी भाषातज्ज्ञ शिक्षक श्रीकांत नाईक (गडहिंग्लज) यांच्या हस्ते होणार आहे.
जाहीर केलेले तालुकास्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार असे - सावंतवाडी-मयुरी कदम (कळसूलकर हायस्कूल सावंतवाडी), कुडाळ-आनंद कदम (माणगाव हायस्कूल, माणगाव), दोडामार्ग-सागर डेगवेकर (सरस्वती विद्या मंदिर, कुडासे), वेंगुर्ले-विजय ठाकर (अणसूर-पाल हायस्कूल, कणकवली-स्नेहल राणे (शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे), मालवण-महेश धामापूरकर (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण), वैभववाडी-सत्तापा पाटील (यशवंतराव चव्हाण विद्यालय, आचिर्णे), देवगड-बाळासाहेब ढेरे (कुणकेश्वर हायस्कूल). श्री. तांबे गेली २४ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन करत असून वक्तृत्व, निबंध, व भाषा कौशल्य याबाबत मार्गदर्शन करत आहेत. ग्रंथालय चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभागी असून मराठी भाषेसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, व ग्रंथ भेट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष भरत गावडे, पुरस्कार निवड समिती प्रमुख पांडुरंग सामंत, संजीवनी फडके, दीपक जाधव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Pollution Crisis : नागपूरचा श्वास गुदमरतोय, संत्रानगरी धोक्याच्या उंबरठ्यावर; प्रदूषणाचा विळखा

Auqib Nabi: जम्मू-काश्मिरच्या गोलंदाजाने इतिहास रचला, रणजी स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी; गौतम गंभीर लक्ष आहे ना तुझं?

तोळ्यात नाही तर किलोत ! विजय-रश्मिकाच्या लग्नासाठी बनवले गेले एवढ्या वजनाचे सोन्याचे दागिने

Latest Marathi News Live Update : नांदेडमधील महापलिकेच्या सफाई कामगारांचे आज काम बंद आंदोलन

Walmik Karad: मनोज जरांगेंचं भाकीत खरं ठरणार? वाल्मिकचा मुलगा धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलणार? फेसबुक पोस्टचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT