कोकण

साहित्य वाचनाने मानवतेची वीण घट्ट

CD

27575

साहित्य वाचनाने मानवतेची वीण घट्ट

डॉ. कार्वेकर ः दोडामार्ग महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २८ : ‘‘माणसाचे आदर्श व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी वाचन अत्यंत आवश्यक आहे. चांगले संस्कार, व्यापक दृष्टी आणि संवेदनशील मन या गोष्टी साहित्य वाचनातूनच विकसित होतात. भाषा ही साहित्याच्या माध्यमातून संस्कृती व परंपरेचे जतन करते आणि ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवते. विविध प्रांतांतील स्थानिक बोलीभाषांमुळे भाषेची गोडी अधिक वाढते. नियमित वाचनाची सवय लागल्यास व्यक्तीचे जीवन अधिक सुसंस्कृत आणि समृद्ध बनते. त्यातूनच माणसे एकमेकांशी अधिक घट्ट जोडली जातात. साहित्य वाचनामुळे माणसाला माणूसपण प्राप्त होते,’’ असे प्रतिपादन येथील गोगटे-वाळके महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर यांनी व्यक्त केले.
येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा मराठी विभाग व मराठी भाषा वाङ्‌मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष सावंत होते. विभागप्रमुख डॉ. दिलीप बर्वे, ग्रंथपाल डॉ. रामकिसन मोरे उपस्थित होते. डॉ. कार्वेकर यांनी आपल्या व्याख्यानात कुसुमाग्रजांचा जीवनपट आणि त्यांचा ज्ञानपीठ पुरस्कारापर्यंत साहित्यिक प्रवास उलगडून सांगितला. त्यांच्या विविध साहित्यकृतींचा परिचय करून देत त्यातील जीवनदृष्टी विद्यार्थ्यांसमोर मांडली.
ग्रंथप्रदर्शनाच्या उद्‍घाटनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रदर्शनात भारतीय राज्यघटनेसह विविध ग्रंथ मांडले होते. मराठी भाषेचा वैभवशाली इतिहास आणि कुसुमाग्रजांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपट दाखविला. सिद्धिविनायक बुक बँकेमार्फत गरजवंत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण केले. प्रा. सावंत यांनी अध्यक्षीय मनोगतात वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. विभागप्रमुख डॉ. दिलीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. सोनिया गवंडळकर हिने सूत्रसंचालन केले. प्रीती जाधव हिने आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या....

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT