-rat२७p१८.jpg-
२६O२७५९६
मुंबई ः रत्नागिरी जिल्हा उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार करुणा गोकर्ण व सोनाली लोहार यांचे हस्ते स्वीकारताना सावर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य तानाजी कांबळे व प्रा. जयसिंग चवरे.
---------
सावर्डे महाविद्यालयाचा राज्यस्तरीय डंका
‘करिअर कट्टा’त प्रथम; प्रा. जयसिंग चवरे यांना द्वितीय क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २७ ः सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित सावर्डे येथील कला व विज्ञान महाविद्यालयाला ‘करिअर कट्टा’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त ‘रत्नागिरी जिल्हा उत्कृष्ट कॉलेज’ म्हणून प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. तसेच प्रा. जयसिंग चवरे यांना उत्कृष्ट महाविद्यालय समन्वयक म्हणून द्वितीय क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी पालकमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळाचे सभापती रवींद्र साठे, महाराष्ट्र राज्य आर्थिक विकास मंडळाचे संचालक सचिन इटकर, सोनाली लोहार, प्रफुल्ल फाटक आदी उपस्थित होते.
सोहळ्यात उत्कृष्ट करिअर संसदमध्ये तृतीय, एडब्ल्यूएस करिअर टूरमध्ये द्वितीय, आपत्ती व्यवस्थापन कार्यासाठी विशेष पुरस्कार महाविद्यालयाने पटकावला. करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, सोलर ऊर्जा जनजागृती आदी उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल हा गौरव करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम व सचिव महेश महाडिक यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
-------
कोट
महाविद्यालयास राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट कॉलेज’ पुरस्कार मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. यापुढेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तयारी, कौशल्यविकास आणि समाजाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील.
-तानाजी कांबळे, प्राचार्य, सावर्डे महाविद्यालय