कोकण

शाळा वाचल्या तर ‘मराठी’ वाचेल

CD

27609

शाळा वाचल्या तर ‘मराठी’ वाचेल

मंगेश मसके ः सावंतवाडीत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः मराठी ही केवळ आपली मातृभाषा असून ती आपली आई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, संत महंतांची ही भाषा आहे. ही भाषा टिकवण्यासाठी आपण अधिक मेहनत घेतली पाहिजे. बंद होणाऱ्या मराठी शाळा वाचवण्यासाठी वज्रमूठ गरजेची आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी केले. कोमसाप शाखा सावंतवाडी व स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सावंतवाडी आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री. मसके म्हणाले, ‘‘मुंबईसारख्या ठिकाणी काही प्रकार बघतो, तेव्हा आपली भाषा हरवली आहे की काय?, असा प्रश्न पडतो. आज इंग्रजी शाळेत झालेला मराठी भाषेचा गौरव बघता इंग्रजी माध्यमातही मराठी रुजली आहे, याचा आनंद झाला. एकीकडे परदेशात मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न होत असताना आपण मात्र मराठीतील काही शब्द हरवत आहोत. त्यामुळे मराठीच्या संवर्धनासाठी संघटनात्मक प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’’
‘कुसुमाग्रज’ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मालवणी कवी दादा मडकईकर, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक ॲड. रुजूल पाटणकर यांचा गौरव केला. मराठी विषयात विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या मनवा साळगावकर हिला गौरविले. यावेळी कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. सुभाष गोवेकर, मुख्याध्यापिका प्राची साळगावकर, मेघना राऊळ, मंगल नाईक-जोशी, सहसचिव विनायक गांवस, संतोष पवार, रामदास पारकर, डॉ. भक्ती तावडे-गांवस, वैभककुमार पारकर, स्टेपिंग स्टोन समन्वयक सुषमा पालव, शिक्षक ग्रिष्मा सावंत, शेफाली तेंडोलकर, निधी सावंत, चैताली वेर्लेकर, अमृता सावंत, प्रगती तेजम, कनिका राजपुरोहित, मेहविश बेग, सुझेन शेख, दीपिका कोरे, कपिल कांबळे आदी उपस्थित होते. मराठी विभाग प्रमुख चैताली वेर्लेकर यांनी प्रास्ताविक केले. मिनानाथ वारंग यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT